मुंबई | काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांच्यावर जणू आभाळच कोसळलं होतं.
अशातच आता सायरा बानो यांची तब्येत अचानक खालावल्याचं वृत्त समोर आलं आहे. सायरा बानो यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सायरा बानो यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांना नेमकं काय झालं आहे? याची माहिती अद्याप समोर आली नाही. सायरा बानो यांची तब्येत अचानक बिघडल्याने चाहते देखील काळजीत पडले आहेत. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत. अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत.
दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो आतून पूर्णपणे तुटल्या होत्या. स्वतःला सावरणे त्यांच्यासाठी खूप अवघड होते. दिलीप कुमार यांच्या पार्थिवाला शेवटचं बिलगून खूप रडताना त्या दिसल्या होत्या.
दरम्यान, सायरा बानो यांनी वयाच्या 17व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 1961 साली त्यांचा ‘जंगली’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिनेता शम्मी कपूर त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसले होते.
या चित्रपटासाठी सायरा बानो यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट नायिकेच्या पुरस्काराचं नामांकन देखील मिळालं होतं. या चित्रपटानंतर त्यांची एक रोमॅन्टिक सीन्स देणारी अभिनेत्री म्हणून प्रतिमा तयार झाली होती. मात्र, जंगली चित्रपटानंतर त्या सातत्याने यशाच्या पायऱ्या चढत गेल्या.
पुढे काही वर्षांनी सायरा बानो आणि दिलीप कुमार हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांमध्ये तब्बल 22 वर्षांचं अंतर आहे. परंतु या दोघांच्या प्रेमामुळे हे केव्हाच जाणवलं नाही. कोणत्याही परिस्थितीत सायरा बानो ठामपणे दिलीप कुमार यांच्यासोबत उभ्या राहिल्या.
महत्वाच्या बातम्या-
चक्क घरात शिरला बिबट्या अन्…, हलक्या काळजाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहु नका
माणुसकीला जागत कुत्र्याला वाचवण्यासाठी ‘या’ प्रकारे तरूणाने घेतली धाव, पाहा व्हायरल व्हिडीओ
अभिनेत्री रसिका सुनीलच्या ‘या’ फोटोंची सोशल मीडियावर होतीय चर्चा, पाहा व्हायरल फोटो
धावत्या ट्रेननं मध्ये आलेल्या ट्रकला दिला धक्का अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ