मुंबई | अनेक कलाकार चिञपटसृष्टीमध्ये येण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. त्यातच काही कलाकारांना खूप स्ट्रगल करावं लागतं तर काहींचं एका राञीतचं नशीब बदलून जात. असे कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करतात.
मराठी चिञपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेञींपैकी एक अभिनेञी म्हणजे रिंकू राजगुरू. ‘सैराट’ या चिञपटामुळे रिंकूचं एका राञीचं नशीब बदलून गेलं.
‘सैराट’ हा रिंकूचा पहिला चिञपट असून, या चिञपटामुळे तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मध्ये रिंकूने आर्चीची भूमिका साकारली होती. तिनं साकरलेली आर्ची प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करुन गेली. प्रेक्षकांना आर्ची इतकी आवडली, की त्यांनी तिच्या भूमिकेमुळे तिला अगदी डोक्यावर घेतलं.
या चिञपटातील रिंकूने केलेल्या आर्चीच्या भूमिकेमुळे एका राञीत तिचं नशीब बदलून गेल. सैराट हा चिञपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला असून अजूनही आर्चीने त्या पाञामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून ठेवलं आहे. रिंकू राजगुरू सह आकाश ठोसर याचा देखील हा पहिला चिञपट असून दोघांच्या करियरची सुरूवात चांगली झाली.
सैराट नंतर रिंकू कागर, मेकअप या चिञपटांमध्ये झळकली. तसेच हंड्रेड आणि अनपॉज्ड यांसारख्या हिंदी प्रोजेक्ट मध्ये सुद्धा दिसून आली. कागर आणि मेकअप या दोन्ही चिञपटांमध्ये तिची भूमिका आर्चीच्या भूमिकेच्या पूर्ण विरुद्ध होती.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये रिंकू म्हणाली, यश आणि अपयश यांवर मी फारसा विश्वास ठेवत नाही. मला माहितीये सगळेच चिञपट सैराट सारखे यशस्वी ठरेलच असं नाही. त्यामुळे मी यश आणि अपयशाचा माझ्यावर जास्त फरक पडू देत नाही.
एका मुलाखतीमध्ये रिंकूला विचारण्यात आलं की, चाहत्यांच्या तुझ्याकडून जास्त अपेक्षा असतात, त्यामुळे तुझ्यावर त्या गोष्टीचं दडपण येतं का? यावर रिंकू म्हणाली, मी माझ्या भूमिकेला आणि चिञपटाच्या कथेला जास्त महत्व देते. चिञपटाच्या भविष्याचा फारसा विचार करत नाही. कारण त्याचं भविष्य हे चिञपटातील सगळ्या कलाकारांवर अवलंबून असतं. तसेच सगळेच चिञपट सैराट सारखे यशस्वी ठरेलचं असं नाही.
जेव्हा माझा कागर चिञपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा तो लोकांना फारसा आवडला नाही. तसेच त्याला चांगला प्रतिसाद पण मिळाला नव्हता. त्यामुळे ठिक आहे, मी यश आणि अपयशाचा माझ्यावर जास्त फरक पडून देत नाही. मी माझ्याकडून 100 टक्के देण्याचा प्रयत्न करते. प्रेक्षकांना माझं काम आवडावं, तसेच माझ्या कामाचं कौतुक करावं. अशी माझी इच्छा आहे, असं रिंकू म्हणाली.
दरम्यान, रिंकू नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चिञपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच समीर जोशींचा ‘छुमंतर’ आणि गजेंद्र आहिरे यांचा ‘पिंगा’ या चिञपटात दिसणार आहे.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
नीतू कपूरचा रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या तयारीचा व्हिडीओ…
सफाई कर्मचारी ते सुुपरस्टार; वाचा ‘या’…
“देवेंद्र फडणवीस म्हणजे काय केंद्रीय तपास यंत्रणा आहे…