एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ; अनिल परबांची मोठी घोषणा

मुंबई | परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कामगारांच्या पगारवाढीची घोषणा केली आहे.

अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. यावेळी मंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उपस्थित होते.

एसटीच्या इतिहासातील ही सर्वाधिक वाढ असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.

जे कर्मचारी एक वर्ष ते 10 वर्ष कॅटेगिरीत आहेत. त्यांच्या मूळ वेतनात पाच हजारांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचं मूळ वेतन 12 हजार 80 होतं त्यांचं वेतन 17 हजार 80 रुपये झालं आहे, असं अनिल परब म्हणालेत.

ज्यांच मूळ वेतन 17 हजार होतं. त्यांना 24 हजार पगार होणार आहे. ही वाढ 41 टक्के आहे. आतापर्यंतच्या एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ आहे. 10 ते 20 वर्षापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 4 हजाराने वाढ केली आहे, असं त्यांनी सांगितलंय.

ज्यांचा पगार 16 हजार होता. त्यांचा पगार 23 हजार 40 झाला आहे. वाढ केल्यानंतर त्यांचा पगार 28 हजार झाला आहे. 20 वर्षे त्याहून अधिक असणाऱ्या कामगारांना 2 हजार 500 ने वाढ देण्यात येणार आहे, असंही अनिल परब यांनी सांगितलं.

ज्यांचं मूळ वेतन 26 हजार रुपये होतं आणि त्यांचं स्थूल वेतन 37 हजार 440 रुपये होतं. त्यांचा पूर्ण पगार आता 41 हजार 40 झालं आहे. ज्यांचं मूळ वेतन 37 हजार होतं आणि स्थुल वेतन 53 हजार 280 रुपये होतं. त्यांचा मुळ वेतन 39 हजार 500 होईल, तर सुधारित वेतन 56 हजार 880 रुपये होईल, असं त्यांनी सांगितलं.

आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवला. विलीनीकरणाचा निर्णय समितीने सरकारडे दिला तर तो मान्य असेल. पण तो निर्णय येईपर्यंत किंबहूना निर्णय होईपर्यंत तिढा असाच ठेवता येणार नाही. त्यामुळे सरकारने कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, असं परबांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘पारले जी’नं शेवटी निर्णय घेतलाच, किंमतीबाबत केली ‘ही’ मोठी घोषणा 

एकनाथ शिंदे की अजित पवार?, महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाकडे जाणार??? 

नाना पटोलेंचा महाविकास आघाडीला झटका, केली ‘ही’ मोठी घोषणा 

शरद पवारांनी शशिकांत शिंदेंना झापलं, म्हणाले… 

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड; देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला