अभिनेता सलमान खान लवकरच बाप बनणार; बघा व्हीडिओ –

अभिनेता सलमान खानच्या लग्नाच्या चर्चा नेहमीच झडत असतात, मात्र आता त्याच्यापेक्षा हटके चर्चा सुरु झाली आहे. सलमान खान लवकरच बाप होणार असल्याचं कळतंय. यासंदर्भात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. सलमान बाप होणार ही चर्चा झडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अशा प्रकारे चर्चा झडल्या होत्या. मात्र सलमाननं काही मनावर घेतलं नव्हतं. लग्न न करता सलमान बाप होऊ शकतो का? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. मात्र या प्रश्नाचं उत्तर इंडस्ट्रीतल्याच अनेक लोकांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.

सलमान खान खरंच बाप बनणार का?

सलमान खानला लहान मुलं खूपच आवडतात. नुकतीच त्याची बहिण अर्पिताला मूल झालं. हे मूल खेळवताना सलमान अनेकदा दिसला आहे. तो आपल्या भाच्यासोबत अनेकदा वेळ देखील घालवतो. सलमानच्या आईला देखील तो लवकरच बाप बनू शकतो, असं वाटतं.  सलमानने देखील अनेकदा अविवाहीत बाप बनण्याची इच्छा व्यक्त केल्याचं कळतंय. सलमानचे अनेक मित्र त्याला या रुपात पाहू इच्छित आहे. त्यांनीही त्याला यासंदर्भात सल्ला दिला आहे. आता सलमान हा सल्ला गांभीर्याने घेणार असल्याचं कळतंय. 

सलमानच्या बाप बनण्याची लाईव्ह शोमध्ये चर्चा-

सलमान ख़ानच्या ‘दस का दम’ या शोमध्ये सलमानच्या बाप बनण्यासंदर्भात चर्चा झाली होती. या शोमध्ये अभिनेता शाहरुखख खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी सहभागी झाली होती. त्यावेळी राणीने हा विषय छेडला होता. शोच्या फायनलमध्ये राणी आणि सलमानमध्ये याबाबत ही चर्चा झाली. सलमानने लग्न राहू द्यावं, आधी बाप बनावं, असं तीनं म्हटलं होतं. तिच्या या वाक्यावर प्रेक्षकांनी सुद्धा चांगल्याच टाळ्या पिटल्या होत्या.

नेमका काय आहे हा व्हीडिओ?-

A post shared by π/2 (@addicted_to_srk_) on

 

लग्न न करता सलमान बाप होऊ शकतो का?

सलमानचं अजून लग्नच झालं नाही तर तो बाप कसा बनू शकतो?, असा प्रश्न अनेकांना सतावताना दिसत आहे. याचं उत्तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपल्या वर्तनाने आधी देऊन ठेवलं आहे. तुषार कपूर, करण जोहर ही काही अशी उदाहरणं आहेत. ज्यांनी आयव्हीएफ तसेच सरोगसीच्या माध्यमातून मूल जन्माला घातलं आहे. त्यामुळे सलमान खान देखील लग्न न करता या तंत्रज्ञानाच्या मदतीने नक्कीच बाप बनू शकतो. आता सलमान यासंदर्भात कधी निर्णय घेणार आणि त्याच्या चाहत्यांना कधी गुड न्यूज देणार हे मात्र सलमानच्याच हातात आहे.