Top news मनोरंजन

दिशा पाटणीला केलेल्या किसींग सीनविषयी सलमान खाननं सोडलं मौन, म्हणाला….

Photo Credit - Salman Khan / Instagram Screenshot

मुंबई| बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून चित्रपटात अभिनेत्री दिशा पाटणी मुख्य भूमिकेत असून रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच सलमानने चित्रपटात पहिल्यांदाच किसिंग सीन देखील दिला आहे.

‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ या चित्रपटाच्या ट्रेलरने इंटरनेटवर धूमाकूळ घातला आहे. पण हा ट्रेलर सर्वाधिक चर्चेत आहे तो म्हणजे एका किसमुळे. सलमान खानने नो ऑनस्क्रिन किसचा आपलाच नियम मोडला आहे. फिल्ममध्ये त्याने दिशा पाटनीला किस केलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

या आधी सलमानने कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन दिले नव्हते. त्यामुळे या चित्रपटासाठी ‘भाईजान’ने आपला ‘नो किसिंग’ नियम मोडल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

आता या सिनेमातील दिशाबरोबरच्या किसिंग सीनबाबत सलमान खानने मौन सोडले आहे. सलमानने सांगितले आहे की, या चित्रपटात त्याचा एक किसिंग सीन आहे पण तो दिशासोबत नसून, तो एका टेपवर आहे.

सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तो या सीनबद्दल बोलताना दिसत आहे. सलमान म्हणाला, ‘या चित्रपटात एक किसिंग सीन आहे. मी दिशासोबत हा सीन केला आहे पण दिशाला किस केलेलं नाही. मी सेलोटेपवर किस केलं आहे. अशाप्रकारे हा सीन शूट करण्यात आला आहे.’ सलमान खाननं दिशाचं कौतुक केलं आहे. दिशाबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘दिशा खूप चांगली मुलगी आहे. तिनं चित्रपटात खूप चांगलं काम केलं आहे. आम्हाला एकाच वयाचे आहोत असं दिसायचं होतं. पण ती माझ्या वयाची नाही तर मी तिच्या वयाचा वाटत आहे.’

सलमान आणि दिशाने यापूर्वी ‘भारत’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपटाचं दिग्दर्शन हे प्रभू देवाने केलं आहे. हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. सलमान आणि दिशा व्यतिरिक्त जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

‘राधे: युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाची निर्मिती प्रभु देवाने केली आहे. या चित्रपटात सलमान एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणी 2019 मध्ये करण्यात आली होती. 2020 मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता अखेर हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

थिएटर व्यतिरिक्त प्रेक्षक ‘झी 5’वर, व्हू सेवा ZEEplex सोबतच भारतातील सर्व प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म जे ‘झी 5’शी संबंधित आहेत, तसेच डिश, डी 2 एच, टाटा स्काय आणि एअरटेल हे प्रमुख डीटीएच ऑपरेटर डिजिटलवर हा चित्रपट पाहण्यास सक्षम असतील आणि प्रेक्षकांना त्यांच्या सोयीनुसार चित्रपट पाहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले जातील.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

महत्वाच्या बातम्या – 

कोरोनाच्या नियमांचं पालन करत नवरा-नवरीनं काठीच्या सहाय्यानं…

कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यावर अभिनेत्री झाली आनंदी,…

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ‘या’ अभिनेत्यांनं…

एक समोर, एक शेजारी मगरींनी आडवला महिलेचा रस्ता त्यानंतर जे…

कोरोना योद्धाला सलाम! कोरोनाने आई, वडिल, भावाचा मृत्यू तरीही…

IMPIMP