Salman Khan | ‘बिग बॉस 18’ चा (Bigg Boss 18) ग्रँड फिनाले काल (18 जानेवारीला) पार पडला. 6 ऑक्टोबर ते 19 जानेवारी असे 100 दिवस हा सीझन लला. अभिनेता करणवीर मेहरा याने यंदाच्या ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकली. विवियन डिसेना उपविजेता ठरला. सलमान खाननेच यंदाच्या सीझनचे सूत्रसंचालन केले होते. गेल्या १४ वर्षांपासून तो ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन करत आहे. त्याच्या सूत्रसंचालनाची चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. दरम्यान, आता पुढचा सीझन सलमान होस्ट करणार नसल्याचा खुलासा त्याने केला आहे.
काय म्हणाला सलमान खान?
‘बिग बॉस 18’ च्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने (Salman Khan) धक्कादायक खुलासा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ‘बिग बॉस 19’ (Bigg Boss 19) हा पुढचा सीझन होस्ट करणार नाही, असे तो म्हणाला. सलमान मस्करीत म्हणाला, “फायनलिस्टला असे वाटत असेल इथपर्यंत आलात म्हणजे आता कोण हरले कोण जिंकले काही फरक पडत नाही.
View this post on Instagram
पण ते तसे नसते.” हे ऐकून सगळेच हसायला लागले. तो पुढे म्हणाला, “बिग बॉसच्या घरात प्रत्येक दिवस अवघड असतो. टॉप 6 पर्यंत पोहोचलेल्या सर्वांचाच मला अभिमान आहे. मी सुद्धा शोचे 15-16 सीझन होस्ट केले आहेत. पण आता पुढचा सीझन करणे शक्य नाही.”
सलमान खानच्या वक्तव्याने चाहते निराश
तो पुढे म्हणाला, “मी खूप खूश आहे. आज स्टेजवर येण्याचा माझा शेवटचा दिवस आहे. विजेत्याचा हात उचलण्याची आणि काम पूर्ण करण्याची मी वाट पाहत आहे.” सलमानच्या या खुलाशानंतर चाहते निराश झाले आहेत. आता हे सलमान मस्करीत म्हणाला की खरोखरच, याबाबत अद्याप शंका आहे.
सलमान खानसाठी कठीण काळ –
गेला काही काळ सलमान खानसाठी (Salman Khan) फारच कठीण सुरू आहे. तब्येतीच्या तक्रारी आणि नंतर लॉरेन्स बिश्नोईकडून सततच्या धमक्यांमुळे सलमान आणि त्याचे कुटुंब चिंतेत आहे. चाहतेही सलमानसाठी काळजी व्यक्त करत आहेत. तसेच, सलमानच्या आगामी ‘सिकंदर’ची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.