सलमान खान एक्स गर्लफ्रेंडसोबत तुर्कीत करतोय मजा?

मुंबई | बॉलिवूड मधील अनेक कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत असतात. वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत राहणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता सलमान खान. सलमानचे रिलेशनशिप हा नेहमीच चर्चेचा विषया राहिला आहे.

त्याच्या रिलेशनशिपविषयी माध्यमांमध्ये नेहमीच वेगवेगळ्या चर्चा रंगत असतात. आता पुन्हा एकदा माध्यमांमध्ये सलमानविषयी अशाच काहिशा चर्चा चालू आहेत. सलमान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर 3’ च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

नुकतंच रशियातून शुटींग पूर्ण करून सलमान आपल्या टीमसह तुर्कीमध्ये शुटींगसाठी गेला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री कतरिना कैफ देखील तुर्कीमध्ये आहे. तुर्कीतील इस्तंबूलमध्ये चित्रपटाचं शुटींग होणार आहे.

सलमान सोशल मीडियावर शुटींगचे फोटो शेअर करताना दिसत आहे. सलमानच्या या पोस्टवरून त्याची मैत्रिण युलिया वंतूर देखील त्याच्यासोबत असल्याचं दिसत आहे. युलियाने देखील इन्स्टाग्रामवरुन तुर्कीतील एका हॉटेलचा व्हिडीओ शेअर केला आहे.

युलियाने ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ चित्रपटातून तिच्या गायकिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सलमानसह युलिया देखील तुर्कीमध्ये असल्यानं माध्यमांमध्ये सलमानविषयी वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत.

काही दिवसांपूर्वीच सलमान खानला मुंबई विमानतळावर तपासणीसाठी थांबवण्यात आलं होतं. सलमान खानला विमानतळावर सीआयएसएफच्या एका जवानानं चौकशीशिवाय आत जाण्यापासून रोखलं होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता.

सलमानला रोखणारे सीआयएसएफचे जवान सोमनाथ मोहंतीवर यांच्यावर सध्या कौतुकांचा वर्षाव होत आहे. सोमनाथनं आपलं कर्तव्य व्यवस्थितरित्या पार पाडल्यामुळं तो रातोरात प्रसिद्ध झाल्याचं पाहायला मिळाला होतं. यावेळी  सलमाननंही नियमांचं पालन केलं आणि नंतर तो विमानतळाच्या आत गेला.

महत्वाच्या बातम्या –

पियंका चोप्रानं पतीसोबत शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोची सोशल मीडियावर चर्चा, पाहा फोटो

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी

शाहरुखची मुलगी सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये राहतेय…

‘तुला बाॅयफ्रेंड आहे का?’ असं विचारणाऱ्या…

अभिनेत्री वैदेही परशुरामीनं खरेदी केली ‘ही’ नवी…