‘सलमान खान माझे कपडे आणि चप्पल सांभाळायचा’, ‘या’ अभिनेत्यानं केला मोठा खुलासा

मुंबई|  बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जाणारा भाईजान म्हणजेच ‘सलमान खान’ एक नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ असं या चित्रपटाच नाव असून सलमान खान यामध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

सलमान खान आणि जॅकी श्रॉफ हे दोघं बरेच वर्षपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. बॉलिवूडमध्ये त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून पडद्यामागे देखील त्या दोघांमध्ये मैत्रीच चांगलं नातं आहे.

बऱ्याच वर्षानंतर सलमान खान आणि जॅकी श्रॉफ हे दोघं ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ या चित्रपटामधून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकत्याच झालेल्या एका इंटरव्हयूमध्ये जॅकीने सांगितले कि, ‘फलक’ या चित्रपटच्या दरम्यान सलमान सहाय्यक दिग्दर्शक होता. तेव्हा त्याने माझे कपडे आणि शूज सांभाळले होते.

सलमानला पहिला ब्रेक मिळण्याकरीता जॅकी श्रॉफ यांनी खूप मदत केली, असा खुलासा त्यांनी केला आहे. सलमान खान जेव्हा सहाय्यक दिग्दर्शक होता, तेव्हा मी त्या निर्मात्यांना सलमानचा फोटो दाखवायचो. अखेर केसी बोकाडिया यांच्या बहिणीच्या नवऱ्याने सलमानला पहिला ब्रेक दिला.

सुरज बडजात्या दिग्दर्शित ‘मैने प्यार किया’ या चित्रपटामधून त्याला स्टारडम मिळालं. पण माझ्यामुळे त्याला पहिला ब्रेक मिळाला आणि अशी आमची मैत्री सुरु झाली. आमची मैत्री काही मोठी नाही. जेव्हा सलमान नवीन सिनेमा घेऊन येतो तेव्हा मी त्यामध्ये भूमिका नक्कीच साकारतो, असं जॅकीने सांगितले आहे.

दरम्यान चाहत्यांनी या दोघांच्या जोडीला खूप पसंती दर्शवली आहे. यापूर्वी या दोघांची जोडी ‘भारत’  या चित्रप़टामध्ये दिसली होती. प्रभुदेवा दिग्दर्शित ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ या चित्रपटात सलमान सोबत दिशा पाटनी मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

सॅनिटायझरच्या चुकीच्या वापरामुळे कारला लागली आग…

हौसेनं गेली पोल डान्स करायला अन्…, पाहा व्हायरल…

‘मेरे रश्के कमर…’, तरूणाचा…

10 वर्षाच्या चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून…

गाडी चालवताना अचानक समोर आला भलामोठा हत्ती अन्…, पाहा…