जयपूर : काळवीट शिकार प्रकरणी आज बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आज जिल्हा सत्र न्यायलयात सुनावणी होणार आहे.
काळवीट शिकार प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाकडून सलमान खानला पाच वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पण शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच त्याला जामीनही मंजूर करण्यात आला होता. पण सुनावणी दरम्यान, सलमानला न्यायालयात उपस्थित राहावे लागेल, असे आदेशही न्यायालयाने दिले होते.
गेल्या सुनावणी दरम्यान सलमान न्यायलयात हजर राहीला नव्हता. त्यानंतर न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांच्या वकिलांना खडसावले होते. नंतरच्या सुनावणी दरम्यान सलमानने उपस्थित राहणे गरजेचं आहे.
जर तो सुनावणी दरम्यान उपस्थित राहिला नाही, तर त्याचा जामीन रद्द करण्यात येईल, असंही न्यायाधीशांनी सलमानच्या वकिलांना सांगितले होते.
सलमान खान यावेळीही न्यायालयात उपस्थित राहिला नाही, तर त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण सलमान खानच्या उपस्थितीवर संशय व्यक्त केला जात आहे. कारण अजूनही सलमानने चार्टर किंवा फ्लाईटचे तिकीटही अजून बुक केलेलं नाही.
महत्वाच्या बातम्या-
…तोपर्यंत चौकशीसाठी येऊ नका; ईडीची शरद पवारांना विनंती!- https://t.co/8suUyTdW7d #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019
तेजस ठाकरेंनी सापाची नवी प्रजाती शोधली- https://t.co/cw75KuFTev #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019
विधानसभेला अमित देशमुखांना ‘या’ दोन नेत्यांचे कडवे आव्हान – https://t.co/xDrvumBs9m @AmitV_Deshmukh @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019