सलमान म्हणतोय मला जुहीशी लग्न करायचं होतं, मी तिच्या वडीलांशीही बोललो होतो पण…

मुंबई | अभिनेता सलमान खान व्यावसायिक आयुष्यापेक्षा नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. सलमान खानचे लग्न हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. सलमान खान लग्न केव्हा करणार? हा एकच सवाल सलमानचे चाहते नेहमी त्याला विचारत असतात.

अशातच आता सलमान खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये सलमान खान त्याच्या लग्नाबद्दल बोलत आहे. सलमान खानला जुही चावलाशी लग्न करायचं होतं, असं सलमान या व्हिडिओमध्ये सांगत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये सलमानने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमानने सांगितले की, जुही अतिशय चांगली आहे. मी तिच्या वडिलांशी जुहीबर लग्न करण्याबाबतही बोललो होतो. परंतु जुहीच्या वडिलांनी या लग्नासाठी नकार दिला होता.

यानंतर जुही चावलाने 1996 मध्ये जय मेहता यांच्याशी लग्न केलं आहे. यावेळी जुही तिच्या करिअरच्या अगदी पीक पॉईंटला होती. हे लग्न अतिशय गुपचूपपणे झालं. या लग्नाबद्दल अनेक लोकांना काहीही माहीत नव्हतं.

दरम्यान, बॉलीवूडचा ‘दबंग’ केव्हा लग्न करणार? तो कोणाशी लग्न करणार? याविषयी सोशल मीडियावर नेहमीच चर्चा चालू असते. सलमान खानचे आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींशी नावे देखील जोडली गेली. त्याच्या लग्नाविषयी आत्तापर्यंत कित्येक भविष्यवाणी देखील केल्या गेल्या.

सलमानचे ऐश्वर्या, कतरिना आणि लुलिया या अभिनेत्रीं बरोबरची प्रेमप्रकरण देखील खूप गाजली. सलमानची प्रेमप्रकरणं मोठ्या प्रमाणात गाजली असली तरी देखील सलमानला अनेकजन तो लग्न केव्हा करणार? हाच प्रश्न सतत विचारत असतात.

सलमान खान सध्या 52 वर्षांचा झाला आहे. वयाच्या 52व्या वर्षी देखील सलमान फिट आणि हँडसम दिसतो. मात्र, तरी देखील अद्याप सलमान खानने लग्न केलं नाही. सलमान खान लग्न का करत नाही? यामागे अनेक तर्क वितर्क आत्तापर्यंत लावण्यात आले आहेत. अशातच नुकतंच सलमानच्या लग्न न करण्यामागचं एक कारण समोर आलं आहे.

सलमान भाईजान आपल्या परिवारावर प्रचंड प्रेम करतो. तो परिवारातील प्रत्येकाचीच विशेष काळजी घेताना नेहमी दिसत असतो. सलमान खानला नेहमी असे वाटते की त्याने जर लग्न केले तर तो त्याच्या परिवारापासून लांब जाईल म्हणून सलमान खान लग्न करत नाही, असं कारण समोर आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी नितेश राणेंचा धक्कादायक गौप्यस्फोट! तपास करणाऱ्या पोलिसांना विचारले ‘हे’ सवाल

मोठी बातमी! लोकप्रिय अॅप ‘ट्वीटर’ लवकरंच भारतात बंद होणार?

‘ते’ प्रकरण अर्जुन रामपालला महागात पडणार! लवकरच होऊ शकते अ.टक?

भाजपला आणखी मोठा झटका! ‘या’ बड्या नेत्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला

‘…तेव्हा किरीट सोमय्यांची बोबडी वळली होती का?’; नाईक कुटुंबियांचा सोमय्या यांना सणसणीत टोला