मोठी बातमी! काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला मोठा दिलासा

जयपूर |  भारतीय सिनेक्षेत्रात अभिनेता सलमान खाननं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सातत्यानं सलमान खान चर्चेत असतो.

सलमान खान आपल्या कारकिर्दीत पडद्यावर आणि पडद्यामागंही अनेकदा वादग्रस्त ठरला आहे. विविध कारणांनी सलमानच्या नावाभोवती वादाचं वलय निर्माण झालेलं सर्वांनी पाहिलं आहे.

सलमान खान हिट अँड रन प्रकरणी अनेकवर्ष अडचणीत होता. त्यानंतर काळवीट हत्या प्रकरणी देखील सलमानला न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या आहेत.

राजस्थानसह अनेक ठिकाणी काळवीट हत्या प्रकरणात सलमानवर गुन्हे दाखल आहेत. परिणामी वेगवेगळ्या ठिकाणी सलमानला जावं लागत होतं.

राजस्थान उच्च न्यायालयात सलमान खाननं एकाच ठिकाणी सुनावणी व्हावी यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयानं मंजूर केला आहे. न्यायालयाकडून सलमानला मोठा दिलासा मिळाला आहे.

आता सर्व याचिकांवर राजस्थान उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सलमान खान सध्या या प्रकरणानं कायदेशीर पेचात अडकला आहे.

सप्टेंबर 1998 मध्ये हम साथ साथ है चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सलमान खान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शिकार केला होती. या प्रकरणात बाकी कलाकारांची निर्दोष मुक्तता केली आहे.

दरम्यान, सलमान खान या प्रकरणात अगोदरच जेलमध्ये जाऊन आला आहे. सलमानवर या प्रकरणात एकूण चार गुन्हे दाखल आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“कोण कोणासोबत झोपतो हे…”, सत्ताधाऱ्यांवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली

Health Tips For Summer: कडक उन्हाळ्यात ‘हे’ 7 पदार्थ नक्की खा… शरीराला आराम मिळेल

स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या प्रदीपचं आनंद महिंद्रांनी केलं तोंडभरून कौतुक, म्हणाले…

Knee pain: कमी वयातच गुडघे दुखतात का?, ही लक्षणं दिसताच वेळीच सावध व्हा

“भाजपला झुंडचा इतका तिरस्कार आणि द कश्मीर फाइल्सचा इतका पुळका का?”