कोरोना योद्धाला सलाम! कोरोनाने आई, वडिल, भावाचा मृत्यू तरीही घरी न जाता रुग्णांची सेवा करत राहीली ‘ही’ महिला डाॅक्टर

नवी दिल्ली| देश सध्या कोरोनाशी मोठी लढाई लढतोय. कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

राज्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची प्रचंड कमतरता जाणवत आहे. अशा बिकट परिस्थितीत आणखी एक महिला डाॅक्टर जिची गोष्ट ऐकूण अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तरीही ती कोरोना रुग्नांसाठी झटत आहे.

अशा संकट काळात अनेकजण प्रेरणादायी कामगिरी बजावताना दिसत आहेत. मुळच्या बिहारच्या असलेल्या महिला डाॅक्टरच्या आई, वडिल आणि भावाचा कोरोनाने मृत्यू झाला. मात्र यादरम्यान या डाॅक्टर आपल्या परिवाराकडे न जाता रुग्णांची सेवा करत राहिल्या. अशा संकट काळात अनेकजण प्रेरणादायी कामगिरी बजावताना दिसत आहेत. यांचंही काम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरताना दिसत आहे.

संबंधित महिला डाॅक्टरचं नाव स्वप्ना असं आहे. स्वप्ना यांचा विवाह झाला असून त्यांना दोन मुलं आहेत. स्वप्ना यांचे पती देखील कोरोना रुग्णांच्या सेवेत आहेत. मागील वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात स्वप्ना यांच्या वडिलांचे निधन झालं. त्यानंतर आठ दिवसांपुर्वी त्यांच्या आईचा देखील मृत्यू झाला. तसेच आयटी कंपनीमध्ये एचआर असलेल्या स्वप्ना यांच्या भावाला देखील सात दिवसांपुर्वी कोरोनाने संपवलं.

तरीही स्वप्ना यांनी आपलं काम न सोडता त्या कोरोना रुग्णांवर उपचार करत राहिल्या. याच कारणामुळे त्या आपल्या कुटुंबीयातील सदस्यांना अखेरचा निरोप देण्यासाठीही पोहोचल्या नाहीत.

याबाबत बोलताना या महामारीच्या काळात रुग्णांवर उपचार करणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र पती-पत्नी दोघेही रुग्णांच्या सेवेत असल्यामुळे मुलांची काळजी वाटतं असल्याचं देखील डाॅ. स्वप्ना म्हणाल्या.

दरम्यान, सध्या वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत असे म्हणत अनेक लोक कोरोना काळात मदत करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

IPL 2021: पंजाब किंग्सचा आरसीबीवर दणदणीत विजय

कौतुकास्पद! वाॅकरशिवाय चालताही न येणारा ‘हा’…

‘तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं…’…

मराठमोळ्या बाॅडिबिल्डरचं कोरोनामुळे निधन, 34व्या वर्षी घेतला…

धक्कादायक! ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे…