युतीवर काळे ढग दिसताच सामनाच्या अग्रलेखातून भाजपचा समाचार!

मुंबई |  भाजपाध्यक्ष अमित शहा रविवारी एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. परंतू युतीची घोषणा न करताच ते निघून गेले. गेले काही दिवस शिवसेना भाजपमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. मात्र त्यावर तोडगा काही निघत नाहीये. चर्चेचं गुऱ्हाळ आणखीही चालू आहे. अशा परिस्थितीत युतीवर काळे ढग दिसताच सामनाच्या अग्रलेखातून भाजपचा घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय प्रश्नांची एक प्रकारची नशा असते अन् त्यापुढे इतर विषय गौन ठरतात. राज्यांच्या प्रश्नावर इतर केव्हाही बोलता येईल, असं सध्या वातावरण आहे. मराठवाड्यात सध्या दुष्काळ आहे तर कुठे होरपळ आहे. पण चंद्रकांत पाटील यांनी आत्मविश्वासाने सांगितले की फडणवीस सरकारने राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लागले आहेत. याआधी असा आत्मविश्वास इतर कोणत्याही पक्षाने दाखवला नव्हता, असे शाब्दिक बाण  आजच्या अग्रलेखातून भाजपवर सोडण्यात आले आहेत.

ज्यांच्याकडे विजयाचा एवढा आत्मविश्वास असतो त्यांचा विजयाचा मार्ग सुकर असतो. याचा आम्हाला आनंदच आहे, असंही सांगायला शिवसेना विसरली नाही.

गुंतवणूक, शिक्षण, शेती उद्योग, आरोग्य अशा क्षेत्रात मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राला पुढे नेले, असं प्रमाणपत्र अमित शहांनी मुंबईत येऊन दिलं अन् पुढचे मुख्यमंत्री फडणवीसच असतील असंही जाहीर केलं, त्यामुळे विधानसभा निवडणूक केवळ औपचारिकता उरलीये. लोकांनी फक्त बटन दाबायचं दुसरं काय?? असं म्हणत भाजपवर शेलक्या शब्दात निशाणा साधला आहे.

दरम्यान, येत्या 26 सप्टेंबर रोजी अमित शहा पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. 26 तारखेला युतीची घोषणा होते की मागच्या विधानसभेच्या वेळेसारखं पुन्हा एकदा स्वबळाची तलवार उपसली जाते हे येणारा काळच ठरवेल.

महत्वाच्या बातम्या-