Top news महाराष्ट्र मुंबई

तुम्ही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडकडे लक्ष दिलं तरी मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल, गडकरींना कानपिचक्या

मुंबई |  भविष्यात मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमधून गर्दी कमी करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या मतावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्राच्या ध्येयधोरणावर भाष्य करण्यात आलं आहे. तसंच नितीन गडकरींना टोले देखील आजच्या अग्रलेखातून लगावण्यात आले आहेत.

केंद्राने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड अशा राज्यांकडे आणि दिल्लीसारख्या शहरांकडे जास्त लक्ष दिले तरी मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल, असं अग्रलेखात म्हटलं गेलं आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे काय ते आम्ही पाहू. मुंबई-पुण्यावर आदळणारी गर्दी कमी करण्यासाठी केंद्राने इतर राज्यांमध्ये रोजगार व पायाभूत सुविधा उभ्या केल्या तर गडकरींची चिंता दूर होईल, असंही सामनामधून सांगण्यात आलं आहे.

कोरोनाची पर्वा न करता मुंबई-पुण्यावर गर्दीचे लोंढे आदळत आहेत. कोरोना संकटावर भुकेची आग मात करीत आहे असाच याचा अर्थ. मुंबईच्या गर्दीचे हेच कारण आहे, असंही संजय राऊत आपल्या अग्रलेखात म्हटले आहेत.

दरम्यान, मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमधून गर्दी कमी होणं आवश्यक आहे. यासाठी मुंबई पुण्याबाहेर स्मार्ट सिटी अथवा स्मार्ट व्हिलेजची निर्मिती केली पाहिजे, असं मत गडकरी यांनी व्यक्त होतं. मुंबई पुण्यासारख्या शहरातून गर्दी कमी करण्यावर भर देणं आवश्यक आहे. तसंच मुंबई बाहेर क्लस्टर डेव्हलपमेंटचेही प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचं गडकरींनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-गडकरींचं एक वक्तव्य अन् संजय राऊतांनी वाचून दाखवला मुंबईचा सारा इतिहास!

-नाना पाटेकरांनी सुशांतच्या पाटण्यातील घरी जाऊन घेतली त्याच्या कुटुंबियांची भेट

-पुण्यात आज 328 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…

-शरद पवारांच्या त्या टीकेला बाळासाहेब थोरातांचं उत्तर, म्हणाले…

-यंदा गणेशाची आगमन आणि विसर्जन मिरवणूक नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय