… म्हणून संभाजी भिडेंना अटक होण्याची शक्यता

बेळगाव | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आत्तापर्यंतच्या सगळ्या सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याने बेळगावमध्ये हे अटक वाॅरंट जारी करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी 13 एप्रिल 2018 रोजी बेळगाव शहराजवळील येळ्ळूर या गावात महाराष्ट्र मैदानात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आचारसंहिता लागू असूनही भिडे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन आपल्या भाषणातून केलं होतं.

आचारसंहितेचा भंग केल्यामुळे निवडणूक आयोगाने संभाजी भिडे यांच्यासह इतर नऊ जणांविरोधात बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, याप्रकरणी होत असलेल्या सगळ्या सुनावणीवेळी संभाजी भिडे गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी करण्यात आला असून पुढील सुनावणी 24 मार्चला होणार आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-“अंगाऱ्या धुपाऱ्याने मंत्री झालेल्या पाटलांचं पद दोन चार महिन्यात जाणार”

-कर्जमाफीच्या हिशेबात बँकांचा घोळ; मंत्री बच्चू कडू यांचा धक्कादायक अहवाल

-कोर्टात जाताना हिंगणघाटच्या आरोपीने केली ‘ही’ इच्छा व्यक्त!

-शालिनीताईंचा अजित पवारांशी पंगा; तात्काळ सत्तेवरून हटवण्याची राज्यपालांकडे मागणी

-मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी ‘आप’ला मतदान करा; मतदानादिनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचं ट्वीट