सांगली | संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार भाषण ठोकलं. आपल्या भाषणात मोदींनी भारताने जगाला बुुद्ध दिला, असं म्हटलं. मात्र त्यांच्या याच वक्तव्यावर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आक्षेप घेतला आहे.
भारताने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध उपयोगाचा नाही तर विश्वाचा संसार चालवण्यासाठी संभाजी महाराजच पाहिजे, असं भिडे म्हणाले.
पंतप्रधान अमेरिकेत चुकीचे बोलले आहेत. मी त्यांना महाराष्ट्रात करेक्ट करतो, असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांना टोमणा मारला.
नवरात्री उत्सवानिमित्त संभाजी भिडे दुर्गामाता दौड यात्रेत सहभागी झाले होते. तरूणांमध्ये हिंदू धर्माविषयी जागृती व्हावी. त्यांचं धर्मावरचं प्रेम वाढावं, या अर्थाने त्यांनी 1982 मध्ये सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडचं आयोजन केलं होतं.
संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून भिडेंवर टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
संजय काकडे तुमचं भविष्याचं दुकान बंद करा- रुपाली चाकणकर- https://t.co/1B7XPm6cuu @ChakankarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 29, 2019
काकडे पैसे खूप आले म्हणून अक्कल येत नसते- जितेंद्र आव्हाड https://t.co/V0tmmKFWdT @Awhadspeaks #Kakde
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 29, 2019
अमेरिकेहून परतणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमानतळावर जंगी स्वागत- https://t.co/qnZdbM1ZUn #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 29, 2019