पुणे | सध्या देशाला गांधीवादामुळे प्रचंड वेदना होत आहेत, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. पुण्यातील सदाशिव पेठ येथे राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आलेल्या गणपती मंडळाच्या देखाव्याचं उद्धाटन भिडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
आपल्याला यातून सुटका करुन घ्यायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा आदर्श घेतला पाहिजे, असं संभाजी भिडे यांनी सांगितलं आहे.
ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला भूतबाधा होते त्याप्रमाणे सध्या देश गांधीवादातून जात आहे. आपण सर्वांनी गणेशोत्सवाची परंपरा जपण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असंही भिडेंनी म्हटलं आहे.
संत तुकाराम यांनी एकदा आपण सर्वांना विठ्ठलाचे भक्त झालं पाहिजे असं म्हटलं होतं. पण सध्याच्या काळात आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या मार्गावर चालण्याची गरज आहे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून रोहित पवार भडकले – https://t.co/tgVk5OOwZr @AmitShah @NCPspeaks @RohitPawarSpeak @PawarSpeaks @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 3, 2019
काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची मुख्यमंत्र्यांशी जवळीक; करणार भाजप प्रवेश??? – https://t.co/ssYnaSBFpV @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 3, 2019
“निवडणूक ‘ईव्हीएम’वर घ्या, बॅलेट पेपरवर घ्या नाही तर हात वर करून घ्या, भाजपच सत्तेत येणार” – https://t.co/WzQhPIhRxS @ChDadaPatil @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 3, 2019