संभाजी ब्रिगेड आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चं काम करणार!

पुणे : काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील संभाजी ब्रिगेडनं मोठा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करणार आहे.

मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच जेजुरी येथं पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

शेतकरी, महिला, कामगार आणि नोकरदारांसाठी शरद पवार यांनी मोठं काम केलं आहे. शरद पवारांच्या पुरोगामी धोरणामुळे महाराष्ट्राची देशात ओळख झाली, असं प्रवीण गायकवाड यावेळी बोलताना म्हणाले.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या पाठिशी उभं राहण्याची भूमिका होती. त्यामुळे त्यांच्या इच्छेनूसार हा निर्णय घेतला आहे, असं प्रवीण गायकवाड यांनी जाहीर केलं.

तिकीट नाकरलं तरी मी काँग्रेसचं निष्ठेनं काम केलं, मात्र काँग्रेस नेत्यांनी आमच्याबद्दल आपुलकी दाखवली नाही शिवाय आमच्या कार्यकर्त्यांना स्वीकारलं नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असं ते म्हणाले.

दरम्यान, प्रवीण गायकवाड यांची संभाजी ब्रिगेड राष्ट्रवादीसोबत उभी राहिल्याने याचा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य यात्रे’स सुरुवात

-“सचिन पायलट किंवा ज्योतिरादित्यांना काँग्रेसचे अध्यक्ष करा”

-“जम्मू काश्मीरचा करार पंडित नेहरुंनी केला, सरदार पटेलांनी नाही”

-काँग्रेसला मोठा धक्का; राज्यसभेतील ‘या’ महत्वाच्या नेत्याचा राजीनामा

-अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयातच सहा शेतकऱ्यांनी केलं विष प्राशन