“मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण लढा देणार”

मुंबई | मराठवाड्याचे दु:ख कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या पाण्यामुळे कमी होणार असेल आणि येथील शेतकरी समृद्ध होणार असेल तर मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण लढा देण्यास तयार असल्याचं भाजपचे सहयोगी राज्यसभा खासदार संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

मराठवाड्याच्या पाण्यासाठी सर्वजण मिळून एकत्रित प्रयत्न करू. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठवाड्याच्या दुष्काळावर काम होईल, असंही संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी औरंगाबाद येथे एकदिवसीय उपोषण केलं होतं.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यात पाण्याची अडचण आहे. विरोधीपक्षाने यावर गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आधीच्या सरकारने मराठवाड्यासाठी महत्त्वपूर्ण अशा मराठवाडा वॉटरग्रीड योजनेची घोषणा केली होती.

महत्वाच्या बातम्या- 

-“अरे काय पाहिजे सांगा, मी द्यायलाच बसलोय”

-सगळे निर्णय अजित पवार घेतायत अन् मुख्यमंत्री गोट्या खेळतायत; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका

-हिटलरने जे जर्मनीत केलं तेच भारतात घडवण्याचा प्रयत्न; आव्हाडांचा घणाघाती आरोप.

-“नरेंद्र मोदींचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”

-जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून होणार सत्कार!