छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होत संभाजीराजे म्हणाले ‘महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय’

मुंबई | संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाकून नमस्कार करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी भावनिक कॅप्शनही दिलं आहे.

महाराज… तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय…मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी… अशी भावनिक पोस्ट संभाजीराजे यांनी केली आहे.

संभाजीराजे यांना शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला. संभाजीराजे हे अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.

महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याची मागणी संभाजीराजे यांच्याकडून मागणी झाली होती. छत्रपती शिवरायांच्या वारसाला पाठिंबा द्या, असं संभाजीराजेंनी म्हटलं होतं. परंतु राज्यसभेच्या उमेदवारीसाठी संभाजीराजे यांना शिवसेना प्रवेशाची अट घालण्यात आली. मात्र संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिला.

दरम्यान, शिवसेनेने महाराजांना उमेदवारी न देता कोल्हापूरमधील संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवार घोषीत केलं आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन अपक्ष लढण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेले संभाजीराजे छत्रपती आता निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची दाट शक्यता आहे. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणीही पाठिंबा न दिल्याने संभाजीराजे यांच्यावर न लढताच माघार घेण्याची नामुष्की ओढावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

मोठी बातमी! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचा झटका 

सुप्रिया सुळेंवर वैयक्तिक टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर सदानंद सुळे संतापले

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला रामराम

महागाईने त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी; सरकारचा आणखी एक मोठा निर्णय 

“मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच…”; ज्ञानवापी प्रकरणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य