“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहून उद्धव ठाकरेंनी सांगावं की मी…”

मुंबई | राज्यसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर केला होता. मात्र शिवसेनेच्या भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपतींनी ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. संभाजीराजेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

मला इतकं वाईट वाटतंय. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द मोडला. स्वराज्य’ बांधण्यासाठी मी सज्ज झालो आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे. 2009 साली लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांची इच्छा होती की सगळ्यांना संघटित करा. मला आज मिळालेली ही संधी आहे, असं त्यांनी म्हटलं.

घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडणूक लढवणार नाही, पण ही माघार नाही, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी, गोरगरिब लोकांना न्याय देण्यासाठी मी स्वराज्याच्या माध्यमातून उभा राहणार आहे, असंही ते म्हणालेत.

मी सांगतोय त्यापैकी एकही शब्द खोटा असेल तर मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवछत्रपतींच्या कोणत्याही स्मारकावर यायला तयार आहे. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहून उद्धव ठाकरे यांनी सांगावे की, मी खोटं बोलत आहे, असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेनं ऑफर दिली ती स्वीकारली असती तर मी खासदार झालो असतो. मला सर्व आमदार म्हणत आहेत की, आपण निवडणूक लढवावी. परंतु मला माहिती आहे, त्याठिकाणी घोडेबाजार होणार आहे, मी निवडणूक लढवणार नाही, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहून उद्धव ठाकरेंनी सांगावं की मी…” 

सेक्स वर्क हा एक व्यवसाय, त्यांनाही सन्मानाची वागणूक द्या- सर्वोच्च न्यायालय 

शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केतकी चितळेला न्यायालयाचा दणका! 

मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिकांचा खळबळजनक खुलासा, म्हणाले… 

मोठी बातमी! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचा झटका