देवेंद्र फडणवीसांबाबत संभाजीराजेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

पुणे | अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पुण्यातून खासदारकीची उमेदवारी द्या अशी मागणी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांना पत्र लिहिले.

भाजपने केंद्रीय निवडणूक समिती आणि केंद्रीय संसदीय मंडळात नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना वगळून देवेंद्र फडणवीस यांना जागा दिली. त्यामुळे त्यांची वर्णी आता केंद्रीय राजकारणात लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर संभाजीराजे भोसले (Sambhajiraje Bhosale) यांनी भाष्य केले आहे. शिवसह्याद्री यूथ फाऊंडेशनच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या लोकसभा उमेदवारीवर भाष्य केले आहे.

फडणवीसांबद्दल बोलताना भोसले म्हणाले, कोण काही बोलत असेल तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. एक समाज कशाला, मला तर वाटते देवेंद्र फडणवीस सगळ्या समाजाचे नेते आहेत. ते एका समाजाचे असूच शकत नाहीत.

ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आता ते उपमुख्यमंत्री आहेत. जर त्यांना खासदार व्हायचे असेल, तर ते एका समाजाचे होऊ शकत नाहीत. त्यांना समाजातील सर्व लोक पाठिंबा देतील असे माझे मत असल्याचे भोसले म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे कुशल राजकारणी आहेत ते चांगले नेतृत्व असून त्यामध्ये काही दुमत नाही किंवा शंका नाही. पण शेवटी राजकारणात वेळेवर काही निर्णय घेतले जातात.

यावेळी त्यांनी गोविंदांच्या आरक्षणावर देखील भाष्य केले. गोविंदांना आरक्षण द्या पण अगोदर मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी यावेळी माध्यमांसोबत बोलताना केली.

महत्वाच्या बातम्या – 

दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवर टीका; म्हणाले, जे हिटलरने केेले…

गोविंदांना आरक्षण देण्यावरुन तृप्ती देसाई संतापल्या आणि मुख्यंत्र्यांकडे केली मोठी मागणी

इंदुरीकर महाराजांविरोधात गावकरी आक्रमक; घेतली पोलिसांत धाव

अजित पवारांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले, येवढा अकांडतांडव…

बिल्कीस बानो प्रकरणात गीतकार जावेद अख्तर आक्रमक, दिली संतप्त प्रतिक्रिया