संभाजी राजेंनी सूत्र फिरवली; गड-किल्ले जिवंत ठेवणाऱ्यांना मदत मिळाली

मुंबई |  कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सध्या अनेकांवर बेरोजगारीचा कुऱ्हाड कोसळली आहे. अनेकांच्या हातातून काम गेली आहेत. त्यामुळे खायचे वांदे झाले आहेत. लॉकडाऊमध्ये गडकिल्ले देखी बंद आहेत. त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रायगड किल्ल्यावरच्या आणि सिंदुधुर्ग गडावरील स्थानिकांच्या मदतीला खासदार छत्रपती संभाजीराजे धावून गेले आहेत.

गडकिल्यावरचे स्थानिक लोक मदतीच्या प्रतिक्षेत होते. याच लोकांच्या मदतीला छत्रपती संभाजीराजेंनी एक पाऊल पुढे टाकत प्रशासनाच्या पातळीला सूत्र हलवत त्यांना मदत मिळवून दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहून माहिती दिली आहे.

संभाजीराजे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, “कोरोना महामारीने अनेकांचे व्यावसाय संपुर्णपणे ठप्प आहेत. काहींना उदरनिर्वाह करण्यासाठी लागणारे साहित्य सुध्दा मिळणे अवघड बनले आहे. दुर्गराज रायगड व किल्ले सिंधुदुर्ग गडांवर अनेक वर्षांपासून राहणाऱ्या, व खऱ्या अर्थाने गड जागता ठेवण्याचे कार्य करणाऱ्या बहुतांश कुटुंबाचा उदरनिर्वाह गड पाहायला येणाऱ्या लोकांच्यावर अवलंबून आहे. गेल्या दोन महीन्यापासून लाँकडाऊन मूळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यांना जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्यात याकरिता रायगड व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, तहसीलदार व प्रांत यांना बोललो होतो. आज गडावरील रहिवाशांना त्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसीलदार व प्रांत यांचे मनापासून आभार”

दरम्यान, मदत मिळाल्यानंतर तेथील स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केलं. तसंच संभाजीराजेंचे आणि शासन-प्रशासनाचे आभार मानले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-सांगलीच्या आजीबाईंचा पॅटर्नच वेगळा; वयाच्या 94 व्या वर्षी केली कोरोनावर मात!

-“देवेंद्र फडणवीस सज्जन माणूस, त्यांनी छाती फाडून दाखवायची का?”

-15 हजार पेक्षा कमी पगार असणाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी घोषणा

-म्हण…म्हणून गोपिचंद पडळकरांना विधान परिषदेचं तिकीट दिलं- चंद्रकांत पाटील

-मध्यम, कुटीर, लघु उद्योगांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा