वाघा बॉर्डरवर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणांनी आसमंत दुमदुमला; संभाजीराजेंचं ट्वीट

मुंबई |  रविवारी संपूर्ण भारतामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. वाघा बॉर्डरवर बिटिंग द रिट्रीट सोहळा पाहण्यासाठी अनेक लोकांनी हजेरी लावली होती. छत्रपतींचे वंशज संभाजीराजेंनी देखील या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. त्यांच्या याच भावना त्यांनी ट्वीटरवरून व्यक्त केल्या आहेत.

पाकिस्तान च्या सीमेवर सुद्धा?!.. मरगळलेल्या मराठा मनाला नवचैतन्याची उर्जा देण्याची शक्ती फक्त ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या महामंत्रात आहे. आज भारताच्या सरहद्दीवर (अटारी बाँर्डर) बिटिंग रिट्रीट सेरेमनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज याठिकाणी आलेले आहेत ही वार्ता तेथील लोकांना समजली आणि त्यांनी उस्फुर्तपणे आमचं स्वागत केलं. महाराजांच्या नावाच्या जय घोषाने सीमेवरचा आसमंत दुमदुमून गेला, असं संभाजीराजेंनी सांगितलंय.

लोकांचं हे प्रेम, ही आत्मियता, पाहून माझं मन भारावून गेलं… डोळे अक्षरशः पाणावले. महाराष्ट्राच्या मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर आमच्या रणमर्द मावळ्यांचा उत्साह, त्यांची माझ्याविषयीची प्रीती मनाला शिवणार नाही तर काय?, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

लोक आजही जीव ओवाळून टाकतात या छत्रपती घराण्यावर. माझा जन्म या घराण्यात झाला यापेक्षा मोठे भाग्य जगात कोणतेही नाही, असंही संभाजीराजे म्हणाले आहेत.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

देशाची संस्कृती टिकली ती शीख आणि मराठ्यांच्या तलवारीवर!- संभाजीराजे

-“वाचाळीवर राऊत…. पवारांची विठ्ठलाशी तुलना महाराष्ट्र सहन करणार नाही”

-ठरवलं तर पाकिस्तानला फक्त 10 दिवसांत धूळ चारू- मोदी

सत्ता असताना गोट्या खेळत होता का?? जलीलांचा पंकजांना सवाल

-सरकार बरखास्त होईल अशी धमकी देणाऱ्या मुनगंटीवारांना थोरातांचं सडेतोड प्रत्युत्तर!