Top news पुणे मनोरंजन महाराष्ट्र

आणखी एक टिकटॉक स्टार काळाच्या पडद्याआड! राहत्या घरी केली आत्मह.त्या

Photo Credit-Instagram/ samir_gaikwad1999_official

सोशल मिडीयावर आपल्या टिकटॉक व्हिडीओजमुळे प्रसिद्ध असलेला टिकटॉक स्टार समिर गायकवाड काळाच्या पडद्याआड गेला आहे. या घटनेमुळे परिसरात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. समिर इंस्टाग्रामवर रील्स टाकायचा गेल्या एक-दिड महिन्यापासून त्याच्या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत होते.

समिरने आपल्या रिल्सव्दारे महाराष्ट्रातील सगळ्यांच्या मनात घर केलं होतं. समिरने निकासा सोसायटी, केसनंद रोड वाघोली परिसरात आपल्या राहत्या घरी पंख्याला गळ.फास लावून आत्मह.त्या केली. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा ध.क्का बसला आहे. ही घटना रविवारी 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

समिरने आत्मह.त्या करण्यापूर्वी रुम आतून बंद करुन घेतली होती. त्यानंतर त्याने साडीचा फा.स बनवला आणि छताच्या पंख्याच्या सहाय्याने आत्मह.त्या केली.

पंख्याला लटकून आत्मह.त्या केल्याची बाब समिरचा चुलत भाऊ प्रफुल याच्या पहिली लक्षात आली. समिरला खाली उतरवून तातडीने त्याला लाईफ लाईन रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर समिरला मृ.त घोषित केलं. प्रफुलने या घटनेची माहिती लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये कळवली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास करायला सुरुवात केली.

पो.लिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान समिर गेल्या काही दिवसांपासून खूप असवस्थ होता. त्याच्या प्रेमसंबंधामध्येही काही काळापासून दूरावा आला असल्याची बाब समोर आली आहे. समिरने आत्मह.त्या केली त्या ठिकाणी कोणतीही सुसा.ईड नोट किंवा एखादी चिठ्ठीही सापडली नाही. त्याच्या शरीरावर मा.रहा.ण केल्याच्या तसेच कोणती प्रकारची जब.रदस्ती केल्याच्या खुणा आढळून आल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

समिर गेल्या काही दिवसांपासून टिकटॉक व्हिडीओ आणि इतर व्हिडीओच्या माध्यमाव्दारे खूप प्रसिद्ध झाला होता. समिरचे वय 22 वर्षे होते. तो पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. आत्मह.त्येनंतर समिरच्या चाहत्यांनी सोशल मिडीयावर त्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करायला सुुरुवात केली आहे.

दरम्यान, अद्याप तरी समिरच्या आत्मह.त्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. परंतू समिरची आत्मह.त्या प्रेमप्रकरणातून झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस सर्व बाबी लक्षात घेऊन तपास करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

गुगलची ‘ही’ खास सेवा होणार बंद; त्वरित बॅकअप न घेतल्यास तुमचा डेटा होणार डिलीट!

नेहा कक्करला आहे ‘हा’ आजार, स्वतःच केला खुलासा म्हणाली….

ध.क्कादायक! लग्नातील आचाऱ्यानं चपात्यांसोबत केला ‘हा’ घाणेरडा प्रकार, पाहा व्हिडिओ

करिना आणि सैफच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन; सोशल मीडियावर चर्चांना उधान

अजित पवार ‘अ‌ॅक्शन मोड’मध्ये; पुण्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!