जात पडताळणी समितीचा समीर वानखडे यांच्याबाबत मोठा खुलासा

मुंबई | शहरातील क्रुझ ड्रग्स प्रकरणी एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आणि माजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यात मोठा आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला होता.

समीर वानखेडे यांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे त्यांच्यावर आरोप होते. तसेच त्यांनी चुकीचे जात प्रमाणपकत्र सादर केल्याचे देखील त्यांच्यावर आरोप होते. पण आता त्यांना दिलासा मिळाला आहे.

जात पंचायत समितीने ते मुस्लिम नसल्याचा खुलासा केला आहे. समीर वानखेडे यांनी मुस्लिम धर्म (Islam) स्वीकारला नसल्याचे समितीने स्पष्ट केले. त्यांनी धर्म स्वीकारल्याचे कोणतेही पुरावे नाहीत असे समितीने स्पष्ट केले.

सध्या गजाआड असलेले नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वानखेडेंनी मुस्लिम धर्म स्वीकराल्याचा आरोप केला होता. त्यानंतर वानखेडे यांनी राष्ट्रीय जात पडताळणी समितीकडे धाव घेतली होती.

राज्य जात पडताळणी समितीने अहवाल सादर केला आहे. त्यात ते मुसलमान नसून ते हिंदू महार (Hindu – Mahar)  असल्याचा खुलासा केला आहे. ते हिंदू नसून मुस्लिम असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता.

जातीचे खोटे पुरावे देऊन समीर वानखेडे केंद्र सरकारच्या सेवेत दाखल झाल्याचे मलिक बोलले होते. त्यांचे संपूर्ण नाव समीर दाऊद वानखेडे (Sameer Dawood Wankhede) आहे, असा दावा मलिकांनी केला होता.

समीर ज्ञानदेव वानखेडे (Sameer Dnyandev Wankhede) हे त्यांचे मूळ नाव असून ते जातीने हिंदू महार आहेत, असा खुलासा राज्य जात पडताळणी समितीने केला.

महत्वाच्या बातम्या – 

“आमिषाला बळी पडू नका”, माजी नगरसेवकांना पक्षप्रमुखांचा सल्ला

“मला तर हे 2019 ला कळाले होते” – उद्धव ठाकरे

आमदार संजय शिरसाट परतीच्या वाटेवर? वाचा काय म्हणाले शिरसाट?

“बाबांनो हात जोडून सांगतो, मी पंतप्रधानपदाचा दावेदार नाही…”

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही भूकंप?; ‘या’ दोन नेत्यांमुळे पवारांचं टेंशन वाढलं