Sana Javed l एकेकाळी स्पोर्ट विश्वात गाजलेलं कपल म्हणजे पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक आणि स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्जा हे आहे. मात्र काही दिवसांपासून पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक आणि सानिया यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र अशातच आता शोएब मलिक पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. (Shoyeb Malik)
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने तिसरे लग्न केले आहे. शोएबने सना जावेदसोबत लग्न केले आहे. मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेल की, शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद कोण आहे? याबाबद्दल आपण जाणून घेऊयात…
Sana Javed l सना जावेद पाकिस्तानी अभिनेत्री :
माजी क्रिकेटर शोएब मालिकांची पत्नी सना जावेद ही एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. सना पाकिस्तानच्या टीव्ही इंडस्ट्रीत काम करत आहे. ती आतापर्यंत अनेक पाकिस्तानी नाटकांमध्ये दिसली आहे. सनाची अनेक प्रसिद्ध (Shoyeb Malik) नाटके आहेत, जी भारतातही मोठ्या प्रमाणावर पाहिली जातात. सना हे पाकिस्तानी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. काला दोरिया, ए मुश्त-ए-खाक, डंक, रुसवाई, दार खुदा से आणि इंतेझार या नाटकांत सणाने काम केले आहे.
सना शोएब मलिकची तिसरी पत्नी :
या प्रकारांत अजून एक खुलासा म्हणजे सना जावेदचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी सनाने 2020 मध्ये उमेर जसवाल सोबत लग्न केले होते, परंतु दोघांमध्ये वाद वाढतच गेले आणि ते विभक्त झाले. तर शोएब मालिकांचे हे तिसरे लग्न आहे.
शोएबचे पहिले (Shoyeb Malik)लग्न आयशा सिद्दीकीसोबत केले होते. त्यानंतर 2010 मध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी दुसरे लग्न केले होते. मात्र आता त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर आता शोएबने सना जावेदसोबत तिसरे लग्न केले आहे.
Sana Javed l शोएब-सनाच्या लग्नाचा खुलासा सोशल मीडियावरून झाला!
शोएब मलिक आणि सना जावेद यांनी त्यांच्या लग्नाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. यामुळे शोएबच्या चाहत्यांना एकप्रकारे धक्काच बसला आहे. तसेच या दोघांनीही लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
News Title : Who is Sana Javed
महत्त्वाच्या बातम्या-
New OTT Release l या आठवड्यात घरबसल्या पाहा अॅक्शन-ड्रामा, रोमान्सने भरलेले चित्रपट
Hsc Student Hall Ticket l बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून परीक्षेचे प्रवेशपत्र मिळणार
Pradhan Mantri Mudra Yojana l महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार तब्बल 10 लाखांचं कर्ज!