शौचालयाला शिवाजी महाराजांचं नाव नाही; संदीप देशपांडेंचा आरोप प्रसाद लाड यांनी खोडला

मुंबई |  भाजपच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला दिल्याचा आरोप करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. मात्र संदीप देशपांडे यांचा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी खोडून काढला आहे.

संदीपजी आपण चुकीची माहिती समाजाला देत आहात. मी केलेल्या ट्वीटमध्ये दोन वस्तू आहेत. शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला दिलेलं नाही, अशी माहिती ट्वीट करून प्रसाद लाड यांनी दिली आहे.

आम्ही 2 लोकार्पणं केली. एक छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशिय केंद्र आणि दुसरं आद्ययावत शौचालय. त्यामुळे आपण चुकीची माहिती समाजाला देऊ नका. आपल्याला मी ते पाहायला येण्यासाठी आमंत्रित करीत आहे, असंही लाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दुसरीकडे महाराजांचं नाव शौचालयाला दिल्याचा आरोप करत “ही लोकं डोक्यावर पडली आहेत का? असं टीकास्त्र संदीप देशपांडे यांनी प्रसाद लाड यांच्यावर सोडलं होतं.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-…अन् अजित दोभालांनी पोलिसांना सांगितली जीवा महाला अन् शिवाजी महाराजांची गोष्ट!

-मुलीला पळवून नेण्याची भाषा करणारे आज विधानसभेत- उद्धव ठाकरे

औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव; ठाकरे सरकारचा निर्णय

-“ही लोक डोक्यावर पडली आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांच नाव शौचालयाला??”

-सरकारी कर्माचाऱ्यांची खाती अ‌ॅक्सिस बँकेत वळवल्याचा फडणवीसांवर आरोप; कोर्टाने धाडली नोटीस