“दिल्लीत काल माझ्या पुतण्याला ED पासून वाचवा अशा आर्त हाका ऐकू आल्या”

मुंबई | राजधानी दिल्लीत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

1773 साली काका मला वाचवा अशा आर्त हाका शनिवार वाड्यात लोकांनी ऐकल्या होत्या. थोड्याश्या वेगळ्या संदर्भात माझ्या पुतण्याला वाचवा,अशा आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या, असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना या भेटीविषयी माहिती दिली. गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नियमांनुसार काम करत नाहीत, ही गोष्ट आपण पंतप्रधानांच्या कानावर घातली.

खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्याचा मुद्दाही पंतप्रधानांसमोर मांडल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

एबीपी माझाशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, इतिहास आपण पाहिला तर 1773 साली शनिवारवाड्यात काका मला वाचवा अशा आर्त हाका ऐकू आल्या होत्या. 2022 साली माझ्या पुतण्याला वाचवा अशा आर्त हाका दिल्लीत ऐकू आल्या. ईडीपासून माझ्या पुतण्याला वाचवा अशा आर्त हाका ऐकू आल्या. त्यामुळे कधी काका मला वाचवा असतं तर कधी माझ्या पुतण्याला वाचवा असं असतं. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते.

महाराष्ट्रात ईडीने महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना दणका देत कारवाई केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती देखील ईडी जप्त केली.

अशीच कारवाई अजित पवार यांच्यावर होऊ नये त्याआधी शरद पवार यांनी मोदींची भेट घेऊन पुतण्याला वाचवा असं मोदींना सांगितल्याचं संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षरित्या सुचवलं.

महत्वाच्या बातम्या- 

“देशाच्या स्वातंत्र्यांचा नवा लढा सुरू, आम्ही बलिदान द्यायला तयार” 

खळबळजनक! ऑर्केस्टा-डान्स बारमालकांचा मुंबई पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप 

 महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग पेट्रोल!

राज ठाकरेंना धक्का?, हा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?

“…तर 2 लाख रूपये भरपाई मिळणार”, नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहिती