“आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे!” – मनसेचे संदीप देशपांडे

मुंबई | शहरातील बेस्टच्या (Brihanmumbai Electricity Supply and Transportation) कंत्राटी कामगारांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. त्या वादात आता मुंबईतील अनेक दिग्गज नेते आरोप प्रत्यारोप करत आहेत. बेस्ट कंत्राटी कामगारांची समस्या दिवसेंदिवस कठीण होत आहे.

आता या समस्येवरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना टोला लगावला आणि तिखट शब्दांत टीका केली आहे. बेस्टच्या कंत्राटी कामगारांना काही महिन्यांपासून पगार नाही, आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे, असे देशपांडे म्हणाले.

मराठी माणूस देशोधडीला लागला असताना, शिवसेनेने गुजरात्यांना कंत्राट दिल्याचा आरोप देशपांडेंनी केला. शिवसेनेने गुजरातच्या कंत्राटदाराला कंत्राट का दिले?, त्यांचा शिवसेनेसोबत काय संबंध? असा प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केला.

संदीप देशपांडे यांच्या आरोपावर मुंबईच्या मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘सौ चुहे खाके बिल्ली हजको चली’, असे म्हणत त्यांनी देशपांडेवर हल्ला चढवला आहे.

गुजरातला दिलेल्या कंत्राटाबाबत बेस्टच्या (BEST) सनदी अधिकाऱ्यांकडे चौकशी करावी, असे पेडणेकर म्हणाल्या. तुम्हाला उठसूठ भ्रष्टाचार दिसतो का, असा पलटवार पेडणेकर यांनी केला.

दरम्यान, बेस्टच्या कंत्राटी कामगारांचे वेतन गेले अनेक महिने रखडले आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. येत्या 5 सप्टेंबरला वेतन न मिळाल्यास कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पाठिंबा दिला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास बेस्टेचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा (Lokesh Chandra) यांना कॅबिनमध्ये बसू देणार नाही, अशा इशारा मनसेने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –

वैज्ञानिकांना लागला दुसऱ्या पृथ्वीचा शोध?

देवेंद्र फडणवीसांच्या “विनाशकाले विपरीत बुद्धिला” आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले…

‘संभाजीराजेंचं नेतृत्व नको’; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

मोठी बातमी! पाकिस्तानने जाहीर केली राष्ट्रीय आणीबाणी; तीस लाख लोक बेघर

पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “विधानपरिषद निवडणुकांत…”