“सामनाकार संजय राऊत रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थीसाठी रवाना, झुकेगा नहीं साला “

मुंबई | जग सध्या युक्रेन-रशिया युद्धाच्या परिणामांचा विचार करण्यात गुंतलं आहे. तर भारतात निवडणुकीच्या निकालांची समिक्षा केली जात आहे.

देशात पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. भाजपनं विरोधी पक्षांना पराभवाची धुळ चारत चार राज्यात आपली सत्ता कायम राखली आहे.

भाजपच्या चार राज्यातील विजयानंतर महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेची सुत्र हातात असलेल्या शिवसेनेवर टीका होत आहे.

शिवसेनेनं उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर या राज्यात आपले उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेने नेते संजय राऊत यांनी जोर लावला होता.

सध्या शिवसेनेच्या निराशजनक कामगिरीचं खापर विरोधक संजय राऊतांवर फोडत आहेत. राऊत यांच्यावर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी जोरदार टीका केली आहे.

उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशा नंतर सामनाकार रशिया आणि युक्रेन मध्ये मध्यस्थी साठी रवाना, असं देशपांडे म्हणाले आहेत.

सध्या गाजत असलेला आणि संजय राऊत यांनी बोललेला पुष्पा चित्रपटातील झुकेगा नहीं साला हा डायलाॅग बोलत देशपांडे यांनी राऊतांना डिवचलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेश आणि गोव्यात मोठ्या प्रमाणावर सभा घेतल्या होत्या.

पाहा ट्विट – 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आई हिराबेन यांची भेट; जेवतानाचे फोटो व्हायरल 

Russia-Ukraine War | पुतिन यांनी 70 वर्षांचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला 

मुंबईतल्या जोडप्याचा खुल्लम-खुल्ला रोमान्स; स्टेशनवर KISS करतानाचा व्हिडीओ तूफान व्हायरल 

“…तर उद्याच राजीनामा देतो, मला मंत्रिपदाने फरक पडत नाही” 

“मला असा संशय येतो की पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे”