“मंत्रालयातील गोड अळूच फदफद आवडतं की ठेचा, भाकरी…निर्णय तुमचा”

मुंबई | मनसेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे. मनसे नेते संदिप देशपांडे यांनी महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक ट्विट केलं आहे.

मंत्रालयातील गोड गोड अळूच फदफद आवडतं की शेतावरची मिरची ठेचा आणि भाकरी. निर्णय तुमचा, असं ट्विट संदिप देशपांडे यांनी केलं आहे. संदिप देशपांडे यांच्या ट्विट्समुळे 48 तासांवर आलेल्या अधिवेशनात मनसेची भूमिका काय असेल? याबाबत उस्तुकता निर्माण झाली आहे.

संदिप देशपांडे यांनी याआधिही एक सूचक ट्विट केलं होतं. ज्यांना लाचारीचा तिटकारा आहे आणि महाराष्ट्र धर्माचा अभिमान आहे त्यांनी राजसाहेबांचे नेतृत्व स्विकारायला हवं, असं संदिप देशपांडे म्हणाले होते.

दरम्यान, मनसेच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटरवरून झेंडा गायब झाला आहे. त्यामुळे आता फक्त रेल्वे इंजिनचंच चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे मनसे येत्या अधिवेशनात नेमकी काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा तर तानाजींच्या चेहऱ्यावर शहांचा फोटो; पहा व्हिडीओ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजय देवगण मंगळवारी ‘तानाजी’ चित्रपट पाहण्यासाठी येणार एकत्र

-1 जून पासून देशात लागू होणार ‘एक देश एक रेशन कार्ड’

‘तुकडे तुकडे गँग’ अस्तित्वात नाही; गृह मंत्रालयाची कबुली

-सांगलीच्या महापौर-उपमहापौरांचा राजीनामा; राजीनाम्यानंतर महापौरांना अश्रू अनावर