बीड | गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी शिवारात सापडलेल्या समाजाला नकोशी झालेल्या नवजात बाळाला जीवनदान मिळालं आहे.
आमदार संदीप क्षीरसागर यांनी या मुलीचं पालकत्व स्विकारलं आहे. राजकारणापलिकडे जात संदीप क्षीरसागर यांनी सामाजिक भान जपल्याचं पहायला मिळालं आहे.
गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी शिवारात या नवजात बाळाला टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मात्र ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या मदतीने या मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यासंदर्भात कळताच संदीप क्षीरसागर यांनी रुग्णालयात जाऊन या मुलीची सर्व जबाबदारी स्वीकारली आहे.
दरम्यान, संदीप क्षीरसागर यांच्या या कृतीची सर्वच क्षेत्रातून वाह वाह केली जात आहे. संदीप क्षीरसागर यांनी समाजासमोर एक नवा आदर्श घालून देत सामाजिक बांधिलकीचा धडा घालून दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी सार्वजनिक कार्यक्रम नको, मात्र ही एक गोष्ट करा”
-“तुम्ही कोरोनाचा आलेख खाली आणायचा सोडून अर्थव्यवस्थेचाच आणला”
-मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात; रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
-केरळात गर्भार हत्तीणीचा मृत्यू; भाजप नेत्या मेनका गांधी राहुल गांधींवर संतापल्या
-कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनाने उचललं महत्त्वाचं पाऊल!