“सुशांतचा मित्र संदीप सिंहच सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंड”

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविलं असून सीबीआयनं आपला तपास सुरु केला आहे. सीबीआय अधिकाऱ्यांची टीम सुशांत मृ.त्यू प्रकरणाशी जोडलेला प्रत्येक धागादोरा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या सुशांतचा मित्र संदीप सिंह सीबीआयच्या रडारवर आलेला आहे.

सुशांत मृत्यू प्रकरणातील मास्टरमाईंड संदीप सिंहच आहे, असा आरोप करणी सेनेचा कार्यकर्ता सुरजित सिंह याने केला आहे. तसेच सुशांतच्या मृत्युनंतर संदीप सिंग अनेकवेळा कॅमेरा समोर दिसला होता. सुशांतच्या पोस्टमॉर्टमवेळी संदीप सिंह कुपर रुग्णालयात उपस्थित होता. त्यामुळे आता संदीप सिंह सीबीआयच्या देखील रडारवर आला आहे.

सुशांत सिंह राजपूत आणि संदीप सिंह या दोघांनी एकत्रच चित्रपट क्षेत्रात आपल्या करिअरला सुरुवात केली होती. संदीप सुशांतचा मित्र होता. मात्र गेल्या दीड वर्षांपासून तो सुशांतच्या संपर्कात नव्हता. सुशांतच्या मृत्यूची वार्ता समजताच संदीप सिंह घटनास्थळी दाखल झाला होता.

सुशांतचा मृतदेह रुग्णालयात नेतेवेळी संदीप सुशांतच्या घरापासून कुपर रुग्णालयापर्यंत सुशांतची बहिण मितू सिंह बरोबर दिसला होता. रुग्णालयात देखील सुशांतचं पोस्टमॉर्टम होईपर्यंत संदीप सिंह उपस्थित होता. मात्र, सुशांतचा जवळचा मित्र असणाऱ्या याच संदीप सिंहवर सुरजित सिंह याने सुशांत मृत्यू प्रकरणात मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, सुशांतचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सीबीआयच्या हाती आले असून रिपोर्टमध्ये अनेक घोळ आढळले आहेत. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्युच्या वेळेचा उल्लेख नाही. तसेच सुशांतची कोरोना चाचणी देखील करण्यात आली नव्हती.

सुशांतच्या रिपोर्टमध्ये घोळ असल्याप्रकरणी सीबीआयनं कुपर रुग्णालयातील सुशांतच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करणाऱ्या पाच डॉक्टरांची चौकशी केली आहे. यावेळी सीबीआयनं डॉक्टरांना सुशांतच्या रिपोर्टमध्ये एवढ्या त्रुटी कशा? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा मुंबई पोलिसांनीच आम्हाला लवकर शवविच्छेदन करण्यास सांगितलं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर ‘मातोश्री’समोर येऊन आंदोलन करू”

सीबीआयच्या टीमसमोर सुशांतचा नोकर नीरजचे नवे धक्कादायक खुलासे

सोनिया गांधी कॉंग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सोडणार; पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना प्रेमप्रकरणी ‘या’ पॉर्नस्टारला द्यावे लागणार 33 लाख रुपये

राज्यातील तीनचाकी सरकारमध्ये फूट? ‘या’ कारणामुळे कॉंग्रेसचे 11 आमदार बसणार उपोषणाला