“चोरी चपाटीचे आरोप असणाऱ्यांनी लायकी ओळखून टीका करावी”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे नसतं, तर ते संगीतकारांमध्ये दिसले असते, अशी बोचरी टीका शिवसेना नेते आणि ठाकरे मंत्रिमंडळातील नवनिर्वाचित पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. यालाच मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चोरी चपाटीचे आरोप असणाऱ्यांनी स्वत:ची लायकी ओळखून टीका करावी, असं म्हणत संदिप देशपांडे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

मनसे हा पक्ष नसून गद्दार आहे. बाळासाहेबांशी गद्दारी करणारे संपले. तुम्हाला जी थोडीफार किंमत मिळत आहे ती केवळ ठाकरे आडनाव असल्यामुळेच मिळत आहे, असा टोला गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला होता.

दरम्यान, संदिप देशपांडे गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टीकेला जोरदार उत्तर दिलं आहे. तसेच लायकी ओळखून टीका करावी, असा घणाघात संदिप देशपांडे यांनी केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-