मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी राज ठाकरे आज चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. आज होणाऱ्या चौकशीच्या पाश्वर्भूमीवर मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेला दादरचा कृष्णकुंज परिसर, दक्षिण मुंबई तसेच संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, अशी प्रतिक्रियी संदिप देशपांडे यांनी दिली आहे. 

राज ठाकरे चौकशीसाठी आज सकाळी ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. संदीप देशपांडेंना  पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. संदीप देशपांडे यांनी काळ्या रंगाचे टी-शर्ट घातले आहेत. त्या शर्टवर ‘EDiots Hitler’ असं लिहीलं आहे. हे टी शर्ट देशपांडे यांनी काढावेत, अशी पोलिसांनी त्यांना सूचना दिली आहे. मात्र टी शर्ट काढण्यास देशपांडेंनी साफ नकार दिला आहे.  

राज ठाकरेंची चौकशी झाल्यास रस्त्यावर उतरू, असं म्हणत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात मनसेकडून ठाणे बंदचं आवाहनही करण्यात आलं होतं. तसेच अनेक आज कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयावर जाणार होते.

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांतता राखा, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस टाळा, सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या, ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नका, असं आवाहन केल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला.

दरम्यान, राज ठाकरेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर बंद मागे घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरेंची आज ईडीकडून चौकशी; संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त

-पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

-मुख्यमंत्र्यांनी काम केलंय तर महाजनादेश यात्रा काढण्याची गरजच काय?; धनंजय मुंडेंची सडकून टीका

-यु ब्रॉडबॅन्डची इंटरनेट सेवा… पुणेकर म्हणतात नको रे देवा….!

-शिवसेना प्रवेशांच्या चर्चांवर खासदार सुनिल तटकरे संतापले; म्हणतात…