मुंबई | कोरोनाग्रस्त रुग्णांची नावं जाहीर करा, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण गुन्हेगार किंवा आरोपी नाहीत. याशिवाय त्यांना HIV सारख्या आजाराची लागण झालेली नाही. त्यांना कुणीही वाळीत टाकणार नाही, असं संदिप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचं नाव जाहीर केल्यास यातून जनजागृती वाढेल. आपला समाज यातून सकारात्मकच भूमिका घेईल, असं संदिप देशपांडे म्हणाले. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.
जी लोक पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आली आहेत ते स्वत:हून जागरुक होतील. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हे अतिशय गरजेचं आहे, असंही संदीप देशपांडे यांनी सांगितलंय.
दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णाचं नाव सोशल मीडियावर जाहीर झाल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबाला त्रासाला सामोरं जावं लागल्याची माहिती समोर आली होती.
महत्वाच्या बातम्या –
-“सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही मात्र कमी उपस्थितीत काम करण्याबाबत विचार”
-पाकिस्तानमध्येही झाला कोरोनाचा शिरकाव
-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टेशनवरची गर्दी कमी करण्यासाठी मुंबई रेल्वेने घेतला हा निर्णय
-सर्व शासकीय कार्यालये 7 दिवस बंद; सरकारचा मोठा निर्णय
-राफेल घोटाळा झाकण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचीच राज्यसभेवर नियुक्ती; काँग्रेसची टीका