मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) लवकरच आपल्या पक्षाची भूमिका आणि आपल्या पक्षाच्या झेंड्यामध्ये बदल करण्याची शक्यता आहे. तसेच मनसे भाजपसोबत हातमिळवणी करेल, अशाही चर्चा होत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बेरीज महत्वाची. नाहीतर काँग्रेस शिवसेनेबरोबर गेली नसती आणि भाजपनी राष्ट्रवादी बरोबर दोन दिवसांची सोयरीक केली नसती, असं माझं वैयक्तिक राजकीय निरीक्षण आहे, असं देशपांडे म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
शिवसेनेनं वेगळा मार्ग पत्करल्याने हिंदुत्वाच्या मुद्यावरुन मनसे भाजपसोबत सलगी करेल असं सांगितलं जात आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडूनही याबाबत अनुकूल प्रतिक्रिया येत आहेत. अशातच देशपांडेंच्या या सूचक वक्तव्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, येत्या 23 जानेवारी रोजी मनसेचं पहिलचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी देणारा प्रसंग पाहायला मिळू शकतो.
महत्वाच्या बातम्या-
CAA च्या समर्थनार्थ पंतप्रधानांना पत्र लिहा, नाहीतर गुण कापू; शिक्षकांची विद्यार्थ्यांना धमकी – https://t.co/4C6zQCkSNd @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020
सत्तेचं ‘टॉनिक’ संपल्यामुळे भाजपची सूज उतरली; शिवसेनेचं सामनातून टीकास्त्र – https://t.co/b26lgj9CVW @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020
‘साहित्य संमेलनाला जाऊ नका’; ना. धो. महानोरांना ब्राम्हण महासंघाची धमकी? – https://t.co/oyiTF509oD @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) January 10, 2020