राहुल गांधींनी पदरी पडलेल्या संधीचे वाटोळे केले; संघाचे टिकास्त्र

नागपूर | एकेका राज्यातली सत्ता हातून निसटण्याची परिस्थिती असतानाही सत्तेचे केंद्र गांधी घराण्याच्या अंगणाबाहेर जाऊ न देण्याच्या धोरणाचे परिणाम हळूहळू समोर येऊ लागले आहेत, असं म्हणत संघ विचारांच्या नागपूर तरुण भारतमधून काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे.

आडनाव गांधी असणं महत्त्वाचं. मग राहुल नावाचा नेताही राष्ट्रीय अध्यक्ष होण्यास पात्र ठरतो. अन्यथा तसं घडलंच कधी नाइलाजाने तर त्यांचा कधी सीताराम केसरी, कधी नरसिंह राव, तर कधी मनमोहन सिंग करण्यात पटाईत आहे तिथली चौकडी, असं म्हणत तरूण भारतने काँग्रेसवर टीकेचा बाण सोडला आहे.

क्षमता आणि लायकीपेक्षाही परंपरेने पदरी पडलेल्या पदाची शान या दोन्ही नेत्यांच्या नंतरच्या पिढीला सांभाळता आली नाही. ना राजीव, ना सोनियांना, असं तरूण भारतच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी पदरी पडलेल्या संधीचे कसे वाटोळे केले, त्याचा इतिहास विस्मरणात गेलेला नाही अद्याप कुणाच्याच, अशा शब्दांत संघाने तरूण भारतमधून गांधी परिवारावर टीकास्त्र सोडलंय.

महत्वाच्या बातम्या –

-स्टेट बॅंकेने घेतले तीन मोठे निर्णय; SBI मध्ये खातं असेल तर नक्की वाचा

-“फक्त आजच नाही तर 365 दिवस शिवजयंती साजरी करायला पाहिजे”

-कोरोनाच्या भीतीने स्वत:ला घरात कोंडून घेतलं; दोघांवर मानसिक उपचार सुरु

-पुण्याजवळच्या शिक्रापूरमध्ये आणखी एक कोरोनाचा संशयीत रुग्ण

-#Corona | राष्ट्रवादीच्या सर्व सभा, बैठका रद्द- नवाब मलिक