सांगलीच्या महापौर-उपमहापौरांचा राजीनामा; राजीनाम्यानंतर महापौरांना अश्रू अनावर

सांगली | सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या महापौर संगिता खोत आणि उपमहापौर धिरज सुर्यवंशी यांनी महापालिकेच्या महासभेत राजीनामा दिला आहे. महापालिकेच्या आयुक्तांकडे महापौर आणि उपमहापौर यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.

राजीनामा दिल्यानंतर महापौर संगिता खोत यांना अश्रू अनावर झाले. त्या महासभेत बोलताना अचानक रडू लागल्या. संगिता खोत या भाजपच्या सांगली महापालिकेच्या पहिल्या महापौर होत्या.

सांगलीच्या महापौर आणि उपमहापौर यांना चंद्रकांत पाटील यांनी स्वत: फोन करून आजच्या महापालिकेच्या सभेत राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. मात्र महापौरांनी आणखी काही दिवसांचा कालावधी देण्याची विनंती केली होती. मात्र पक्षाने ही मागणी फेटाळून लावली.

दरम्यान, महापौरपदासाठी अडीच वर्षांसाठी ओबीसी महिला आरक्षण होतं. मात्र भाजपने दीड वर्षांतच महापौर बदलण्याचा निर्णय घेतला.

महत्वाच्या बातम्या- 

-बाळासाहेबांनी हे खपवून घेतलं नसतं; आव्हाडांच्या त्या वक्तव्यावर राम कदम संतापले

-“राजमुद्रा हे छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीय प्रतीक आहे त्याचा वापर मतांची भीक मागण्यासाठी नका”

-#मेरा_PM_झूठा_है ट्वीटरवर ट्रेंड; तब्बल 88 हजारांहून अधिक ट्वीट

-विराट महान खेळाडू तर रोहित ऑलमोस्ट टॉप 5 फलंदाज; अ‌ॅरोन फिंचने उधळली स्तुतीसुमनं

-तान्हाजी चित्रपटात चुकीचा इतिहास रंगवलाय; सैफ अली खानचा गंभीर आरोप