देश

बायकोला ही गोष्ट करायला सांगणं अत्याचार नाही; कोर्टाचा निर्णय

पत्नीला चांगला स्वयंपाक आणि घरातील काम करायला सांगणे हा अत्याचार होऊ शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 17 वर्षांपूर्वीच्या खटल्यातून पती आणि त्याच्या आई-वडिलांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

सासरी होणारा छळ आणि पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून विवाहित महिलेनं विष पिऊन आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला होता. या खटल्याची उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

पत्नीला चांगला स्वयंपाक आणि घरातील कामे सांगणे म्हणजे तिचा छळ केला असा त्याचा अर्थ होत नाही, असं न्यायाधीशांनी म्हटलं. याचिकाकर्त्यांनी कोणताही पुरावा सादर केला नाही. आरोपीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचे सिद्ध होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, सांगलीतील महिलेनं 5 जून 2001 रोजी आत्महत्या केली होती. त्यापूर्वी तिचे आजोबा आणि मामेभाऊ तिच्या घरी आले होते. त्यावेळी दोघांमध्ये भांडण झालं होतं. आजोबांनी दोघांनाही शांत राहण्यास सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर काही वेळानं नातीनं विष पिऊन आत्महत्या केल्याचं त्यांना समजलं.

IMPIMP