Sania Mirza Instagram Post l सानिया मिर्झाची इंस्टग्राम पोस्ट होतेय ट्रोल! पाहा नक्की काय आहे

Sania Mirza Instagram Post l टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबतच्या घटस्पोटामुळे सानिया बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र अशातच शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत लग्नाचे फोटो समोर आल्यावर या सानिया सोबतच्या घटस्फोटाच्या बातम्यांना दुजोरा मिळाला आहे. अशातच आता पुन्हा एकदा सानिया मिर्झा चर्चेत आली आहे.

Sania Mirza Instagram Post l सानिया मिर्झाने केला नवा फोटो शेअर :

शोएब मलिकने लग्न केल्यानंतर सानियाने पहिल्यांदाच एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सानियाने स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती आरशात स्वत:ला पाहताना दिसत आहे.

सानियाचा हा फोटो पाहून ती स्वतःशीच बोलत असल्याचे दिसते. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शन तिची अवस्था चाहत्यांसमोर मांडली आहे. सध्या ती सोशल मीडियावर जे काही शेअर करत आहे, त्याचा थेट संबंध तिच्या अयशस्वी वैवाहिक आयुष्याशी चाहते जोडत आहेत.

Sania Mirza Instagram Post l सानिया शोएबचे 13 वर्षांचे नाते तुटले :

लग्नाच्या 13 वर्षानंतर शोएब मलिक आणि सानियाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. शोएबच्या लग्नाचे चित्र समोर आल्यानंतरच सानियाच्या वडिलांनी आपल्या वक्तव्यात सानिया आणि शोएब वेगळे झाल्याचा खुलासा केला होता. सानियाच्या वडिलांनी सांगितले होते की, सानियानेच शोएबसमोर ‘ओपन अप’ केले होते.

माजी क्रिकेटर शोएब मलिक आणि टेनिसपटू सानिया मिर्झा 2010 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. या दोघांना एक मुलगा इझान देखील आहे. शोएबच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर अनेक यूजर्सने त्याला ट्रोल केले आहे.

सना जावेद हि एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. तिने पाकिस्तानी चित्रपटात, नाटकात काम केले आहे. सनाने काला दोरिया, ए मुश्त-ए-खाक, डंक, रुसवाई, दार खुदा से आणि इंतेझार या नाटकांत काम केले आहे.

News Title : Sania Mirza Instagram Post

महत्त्वाच्या बातम्या-

Fighter Online Leaked l या वेबसाईटवर फायटर चित्रपट ऑनलाईन लीक! निर्मात्यांना मोठा धक्का

Winter Child Care Tips l हिवाळ्यात लहान मुलांना आंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती?

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील

Pune Tourist Places l या प्रजासत्ताक दिनी पुण्यातील या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Manoj Jarange Live l मनोज जरांगेंनी सरकारला दिला इशारा! तोडगा निघाला नाही तर…