बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी; संजू बाबूला कोरोना नाही पण झालाय ‘हा’ गंभीर आजार

मुंबई | बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं ग्रासल्याची वृत्त समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड इंडस्ट्रीतील मुन्नाभाई म्हणजेच संजय दत्त यांनाही श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, संजय दत्त यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

संजय दत्त यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली, मात्र त्यांना फुफुसांचा कॅन्सर झाला आहे. संजूबाबाचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कुटुंबियांसह चाहते आनंदात होते. मात्र, त्यांचा हा आनंद क्षणिक ठरला आहे.

61 वर्षीय संजय दत्त यांना पुढील उपचारासाठी अमेरिकेला हलवण्याची तयारी चालू आहे. संजय दत्त यांच्या प्रकृतीची माहिती चित्रपट व्यवसाय विषयाचे अभ्यासक आणि संपादक कोमल नाहटा यांनी ट्विटरवरून दिली आहे.

दरम्यान, मी कामापासून काही काळ ब्रेक घेत आहे. लवकरच परत येईन, असं संजय दत्त यांनी ट्विटरवरून सांगितलं होतं. यानंतर संजूबाबाला नेमकं काय झालंय हा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला होता. अखेर संजय दत्तला नेमकं काय झालंय याचा उलगडा नाहटा यांनी केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

सुशांतचे पोस्टमोर्टम रिपोर्ट आम्हाला दिले नाहीत…; बिहार सरकारचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

पती अन् सासू सासऱ्यानेच रचला तिच्या मृत्यूचा कट; कारण ऐकूण व्हाल हैराण!

मुंबई हादरली! धावत्या कारमध्येच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

महाराष्ट्राने कोरोना नियंत्रणात आणला तर देश ही लढाई जिंकेन- नरेंद्र मोदी

महाराष्ट्राने कोरोना नियंत्रणात आणला तर देश ही लढाई जिंकेन- नरेंद्र मोदी