संजय दत्तची मुलगी त्रिशाला करणार आपल्याच एका चाहत्यासोबत लग्न?

मुंबई | बॉलिवूड अभिनेता संजय दत्त नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. बॉलिवूडचा खलनायक खूप वर्षांनंतर आता चित्रपटांंमध्ये पुन्हा झळकताना दिसत आहे. संजय दत्त हे मनोरंजन विश्वातील एक मोठं नाव असलं तरी संजय दत्त यांची मुलगी त्रिशाला दत्त हिने नेहमीच चित्रपट सृष्टीपासून लांब राहणे पसंत केले.

त्रिशालाने केव्हाच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. त्रिशाला जरी मनोरंजन विश्वापासून लांब असली तरी देखील सोशल मीडियावर तिचं फॅन फॉलोविंग एखाद्या प्रसिद्ध कलाकारापेक्षा कमी नाही.

त्रिशाला सोशल मीडियावर सतत काही न काही शेअर करत असते. तसेच सोशल मीडियावर लाईव्ह येत ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. यामुळे त्रिशाला नेहमीच चर्चेत राहते. आता त्रिशाला पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह सेशनमध्ये चाहत्याच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरामुळे चर्चेत आली आहे.

त्रिशालाने डिप्रेशनवर एक लाईव्ह सेशन आयोजित केलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. त्रिशालाने देखील प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. याचवेळेस एका चाहत्याने तिला असा प्रश्न केला ज्याने तिला आश्चर्यचकीत केलं.

लाईव्ह सेशनदरम्यान एका चाहत्याने तिला लग्नाची मागणी घातली. तो तिला सवाल करताना म्हणाला की, मिस दत्त तुम्ही केव्हाच माझ्या प्रश्नांची उत्तरे देत नाही. तुम्ही माझ्याशी लग्न करणार का?

यावर उत्तर देताना त्रिशाला म्हणाली की, मी या प्रश्नाचे उत्तर देत नाही कारण याचा मानसिक आरोग्याशी काहिही संबंध नाही. तसेच डेटिंगच्या बाबतीत माझं नशीब चांगलं नाही.

महत्वाच्या बातम्या-

पती विरोधात दीपिकानं केली तक्रार, रणवीरने वचन तोडलं आणि…

…म्हणून मुलाच्या मृत्यूनंतर देखील सिद्धार्थची आई घेत आहे शेहनाजची काळजी

‘जराही लाज वाटत नाही का?’, अंडरवियर जाहिरातीमुळे वरुण धवन वादाच्या भोवऱ्यात

“सिद्धार्थचा मृत्यू ह्रदयविकारामुळे झाला नाही, त्यादिवशी त्याच्या गाडीच्या काचा देखील फुटल्या होत्या”

‘आर्यनने मुलींना डेट करावे, ड्रग्ज घ्यावेत, सेक्स करावा’; मुलाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शाहरुख पुन्हा चर्चेत