मुंबई | एकनाथ खडसे यांच्यावर भाजपने कोणताही अन्याय केलेला नाही. त्यांना पक्षाने वेळोवेळी अनेक संधी दिली. त्यांच्या मुलीचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे ते भाजपवर टीका करत आहेत, असं भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे.
मागच्या काही दिवसांपासून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे सातत्याने भाजपच्या कामगिरीवर आपली नाराजी बोलून दाखवत आहेत. जे यशाचं श्रेय घेतात, त्यांनी पराभवाचं पण घ्यावं, ज्यांनी नेतृत्व केलं, त्यांनी ती जबाबदारी घ्यावी, असं खडसे काल म्हणाले होते.
पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव झाला नाही तर तो घडवून आणला गेला. ओबीसी नेत्यांवर भाजपमध्ये अन्याय केला जातोय, असंही काल खडसे म्हणाले. त्यावर संजय काकडेंनी आपलं मत मांडलं आहे.
दरम्यान, मी भाजपचा खासदार नाही, भाजपचा सहयोगी खासदार आहे. त्यामुळे भाजपला सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही, असंही संजय काकडेंनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या-
“सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटलेत” – https://t.co/3geZXUgqGn @dhananjay_munde @Dev_Fadnavis @Avadhutwaghbjp @BJP4Maharashtra @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समिती काढणार थेट विधानभवनावर मोर्चा! – https://t.co/Xa2rwksWyY #KadaknathKombadi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
“अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावं” – https://t.co/9O8sapfnz4 @RamdasAthawale
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019