आता कुणाला नाना, मामा दादा आणि काकाला घाबरायची गरज नाही- संजय काकडे

पुणे | शहरात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे कोणीही कसल्याही बाबतीत चिंता करू नये. आता कुणाला नाना, मामा दादा आणि काकाला घाबरायची गरज नसल्याचं सांगत राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोेला लगावला आहे.

भाजप पुणे शहराध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी भाजप मेळाव्यात संजय काकडे बोलत होते.

भारतीय जनता पक्षाची पुणे शहरातील ताकद मोठी आहे. त्यामुळे सत्ता असो अथवा नसो, प्रभाग असो की वॉर्ड आपण सर्वांनी जनतेची व शहराच्या विकासाची कामे केलीत तर, पुणे महापालिकेत पुन्हा आपलीच सत्ता येईल, असंही काकडे यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, भाजप मेळाव्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीष बापट, आमदार मेधा कुलकर्णी आणि आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह भाजपचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या- 

-जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देत अरूण गवळीची सर्वोच्च न्यायालयात धडक

-पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ काळाच्या पडद्याआड

-आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल; चव्हानांनी घेतला आव्हाडांचा समाचार

-इंदिरा गांधींबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड म्हणतात…

-ऐसे कैसे चलेगा खानसाब?; पुणे पोलिसांचं ट्विट