…म्हणून काॅंग्रेसनं सत्तेतून बाहेर पडावं; ज्येष्ठ काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

मुंबई |  महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे कारण माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि पक्षाचे नेते संजय निरूपम यांनी कोरोनाची परिस्थिती हाताळताना ठाकरे सरकार अपयशी ठरतं आहे. त्यामुळे काँग्रेसने सरकारबरोबर न राहता सरकारमधून बाहेर पडावं, असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात आता उलट-सुलट चर्चांना सुरूवात झाली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटतात, त्यानंतर लगेचच ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत भेटतात, त्यांच्यात काय शिजत आहे, हे मला माहित नाही, मात्र प्रत्येकवेळी कॉंग्रेसला आंधारात ठेवलं जातंय, असं निरूपम म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहिती नाही. पण माझ्या वैयक्तिक मतानुसार काँग्रेसने सत्तेत न राहता आता सत्तेबाहेर पडायला हवं, असं निरूपम म्हणाले.

दुसरीकडे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी देखील महाराष्ट्रात काँग्रेसला निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, अशी खंत बोलून दाखवली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. तसंच ठाकरे सरकार स्थिर आहे का? असे प्रश्न देखील उपस्थित होऊ लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपमध्ये वरिष्ठ नेते असतील, पण मी… नारायण राणेंनी भाजप नेत्यांना सुनावलं

-राज ठाकरेंचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पत्र; केली ‘ही’ मागणी

-महाराष्ट्रात आमचा सरकारला पाठिंबा, पण…- राहुल गांधी

-चार वाजता काय होणार? फडणवीसांच्या ‘या’ कृतीकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष!

-“पॅकेजची रिकामी खोकी व विरोधकांची रिकामी डोकी, एकदा गुजरातची अंधारकोठडी बघायला जा”