महेंद्रसिंग धोनी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार?? मुख्यमंत्रीपदाची ऑफर??

मुंबई | भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता इतर खेळाडूंनाही भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येतंय. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी लवकरच निवृत्ती घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असा दावा माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी केला आहे.

2019च्या अखेरीस धोनी राहत असलेल्या झारखंडच्या विधानसभेची निवडणूक होत आहे. त्या निवडणुकीआधीच धोनी भाजपात प्रवेश करेन आणि भाजपदेखील धोनीला मुख्यमंत्रीपदाची मोठी ऑफर दिली जाईल, असं सांगण्यात येत आहे.

धोनीने अनेक वर्षांपासून क्रिकेट खेळून देशसेवा केली. त्याने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन समाज आणि देशसेवेसाठी राजकारणात यावं, असंही पासवान यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीआधी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी धोनीची संपर्क फॉर समर्थन या अभियानाअंतर्गत भेट घेतली होती. धोनीला राजकारणात प्रवेश करायचा झाल्यास तर तो भाजपातच प्रवेश करेन, अशाही मोठ्या प्रमाणावर चर्चा आहेत.

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत. त्यातच धोनी पुढची इनिंग राजकारणाच्या क्षेत्रात खेळणार असल्याच्या चर्चांना जोर चढला आहे.

दरम्यान, धोनी क्रिकेटमधून संन्यास घेऊन खरंच राजकारणात उतरतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.