शिवसेनेच्या संजय राठोडांचं खातं काँग्रेसकडे; संजय राठोड म्हणतात…

मुंबई | राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांच्याकडील मदत आणि पुनर्वसन खातं कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. दुय्यम दर्जाचे खातं मिळाल्याने वडेट्टीवार नाराज होते. त्यामुळे त्यांना भूकंप पुनर्वसनऐवजी मदत पुनर्वसन खातं दिलं जाणार आहे.

मंत्रिमंडळ हे टीम वर्क आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहे हेच सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, असं संजय राठोड  यांनी म्हटलं आहे.

आमच्या टीमचे कप्तान हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. खातं कोणतं असावं त्यापेक्षा मी त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहे हे महत्त्वाचे आहे. मी मंत्रिमंडळात असणे हे माझे नशीब समजतो, असं संजय राठोड यांनी सांगितलं आहे.

मदत पुनर्वसन खातं कोणत्या एका सहकारी मंत्र्याला दिलं तर तिथं चांगला काम होईल. जर ते माझ्याकडे राहिलं, तरी मी त्यावर चांगलं काम करेन. पण काहीही असलं तरी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम करायचे आहे, असंही राठोड  यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-