संजय राठोडांना पुन्हा मंत्री व्हायचंय, म्हणाले ‘उद्धव ठाकरे मला मानसन्मानाने ….’

वाशिम | माझ्यावरील आरोपांच्या प्रकरणाची चौकशी झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला पुन्हा मानसन्मानाने मंत्रिमंडळात घेतील, अशी आशा शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली आहे.

मंत्रिपदाची संधी मिळाली तर आणखी चांगलं काम करू, असंही संजय राठोड यांनी नमूद केलं. ते वाशिममध्ये एबीपी माझाशी बोलत होते.

राजकीय जीवनात मी चारवेळा प्रचंड मतांनी निवडून आलोय. कोणीही असे आरोप करून माझे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रकार झाला तो अतिशय निंदनीय आहे. मी राजीनामा देतो, चौकशी होऊ द्या. त्याप्रमाणे मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला, असं त्यांनी सांगितलं.

या प्रकरणाची चौकशी झाल्यावर ते पुन्हा मला मानसन्मानाने मंत्रिमंडळात घेतील. त्यांनी मंत्रिपदाची संधी दिली तर मला आणखी चांगलं काम करता येईल. येणाऱ्या काळात पोहरागडचा विकास आणि इतर महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न सर्वांना त्या पदावर राहून न्याय देता येईल, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, परळी येथील पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीने पुण्यात वर्षभरापूर्वी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

या आत्महत्येच्या मागे माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod)यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिंपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“शरद पवारसाहेब नसते तर मी कधीही खासदार झाले नसते” 

“राजकारण करण्याच्या नादात आपले संस्कार विसरून गेलेत” 

“मातोश्रीत बसलेल्यांनी सभेला लाखोंची गर्दी जमवून दाखवावी” 

सिनेसृष्टीला मोठा धक्का; प्रसिद्ध अभिनेते शिवकुमार सुब्रमण्यम यांचं निधन 

“वेळ जवळच आहे, आता काही फार दिवस नाहीत”